शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
4
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
5
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
6
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
7
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
8
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
9
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
10
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
11
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
12
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
13
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
14
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
15
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
16
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
17
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
18
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
19
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
20
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ना रेमडेसीवीर, ना लसीकरण सुरु! गोवा सरकार देणार 'या' पाच गोळ्या; परदेशांत ठरल्या प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 13:55 IST

CoronaVirus Goa Government Decision: आयव्हरमेक्टिन या इतर औषधी गोळ्यांप्रमाणेच दिसणाऱ्या गोळ्या आहेत. त्या विविध ब्रँडमध्येही येतात. दोन प्रकारचे हे डोस आहेत. एक प्रायमरी प्रोफिलेक्सिस तर दुसरा सेकंडरी प्रोफिलेक्सिस, वयोमानानुसार हे डोस दिले जातात. कोरोनाची कोणतीही लक्षणे जरी दिसून आली नसली तरी हे डोस घेणे खबरदारीसाठी चांगले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : कोरोना विरोधी लसीकरण (Corona Vaccination) जरी अद्याप गोव्यात सुरू करता आले नसले तरी अठरा वर्षांवरील व्यक्तींना प्रतिबंधात्मक औषधे (आयव्हरमेक्टिन गोळ्यांचे डोस) लवकरच उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. यामुळे कोरोना संसर्ग टाळणे अशक्य असले तरी कोरोना संसर्ग धोकादायक प्रमाणात होण्यापासून बचाव होतो, असे आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे. (All people above 18 years in Goa will be given Ivermectin drug irrespective of their coronavirus status to bring down mortality.)

आयव्हरमेक्टिन (Ivermectin drug on Corona death) या इतर औषधी गोळ्यांप्रमाणेच दिसणाऱ्या गोळ्या आहेत. त्या विविध ब्रँडमध्येही येतात. दोन प्रकारचे हे डोस आहेत. एक प्रायमरी प्रोफिलेक्सिस तर दुसरा सेकंडरी प्रोफिलेक्सिस, वयोमानानुसार हे डोस दिले जातात. कोरोनाची कोणतीही लक्षणे जरी दिसून आली नसली तरी हे डोस घेणे खबरदारीसाठी चांगले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

विश्वजीत राणे म्हणाले की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. अठरा वर्षांवरील लोकांसाठी सुरू झालेली लसीकरण मोहीम गोव्यात साठा उपलब्ध नसल्यामुळे अद्याप सुरू करता आलेली नाही. परंतू,  ही प्रतिबंधात्मक औषधे प्रत्येक प्राथमिक केंद्रांवर, तसेच जिल्हा इस्पितळात उपलब्ध असणार आहेत. कोविड बाधा होण्यापूर्वी हे डोस घेणे हितकारक आहे.

कितपत प्रभावी?

पाच दिवसांच्या गोळ्यांचा हा डोस आहे. या गोळ्यांमुळे अनेक संसर्ग टाळता येतात. कोरोना पूर्णपणे टाळता येत नाही. परंतु कोरोना संसर्ग झालाच तर त्याची तीव्रता कमी करणारा हा डोस आहे. ब्रिटन, इटली, स्पेन आणि जपानमध्ये असे प्रयोग प्रभावी दिसून आल्याची माहितीही राणे यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा