शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रॉयल्टी भरलेल्या खनिज मालाच्या वाहतुकीस परवानगी देणारा सरकारचा आदेश रद्दबातल, हायकोर्टाचा दणका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 13:31 IST

गोव्यात रॉयल्टी भरलेल्या खनिजमालाची 15 मार्चनंतरही वाहतूक करण्यास परवानगी देणारा आदेश सरकारच्या अंगलट आला आहे.

पणजी : गोव्यात रॉयल्टी भरलेल्या खनिजमालाची 15 मार्चनंतरही वाहतूक करण्यास परवानगी देणारा आदेश सरकारच्या अंगलट आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हा आदेश रद्दबातल ठरविताना लीज क्षेत्राबाहेर असलेल्या खनिजाबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला चार आठवड्यांची मुदत दिली आहे. सरकार काय भूमिका घेते हे पाहणे उत्कंठेचे ठरले आहे. 

न्यायमूर्ती एम. एम. जमादार आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा निवाडा दिला. 15 मार्चनंतर झालेल्या खनिजमालाच्या वाहतुकीस गोवा फाउंडेशन या संघटनेने आव्हान दिले होते. या प्रकरणी जोड याचिकाही सादर करुन खनिज वाहतूक हा खाण व्यवसायाचाच विस्तारित भाग असल्याचा दावा केला होता. गेल्याच आठवड्यात या याचिकेवरील उभय बाजूंचे युक्तिवाद पूर्ण होऊन निवाडा राखून ठेवण्यात आला होता. 

7 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील 88 खाण लीजेस रद्दबातल ठरविल्या होत्या. या सर्व लिजांचे दुस-यांदा नूतनीकरण झाले होते. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर 15 मार्चपासून राज्यातील सर्व खाणी बंद आहेत. परंतु खनिज वाहतूक चालू ठेवल्याने त्यास आक्षेप घेऊन संघटनेने आव्हान याचिका सादर केली होती. लीज क्षेत्राबाहेरील रॉयल्टी भरलेल्या खनिजमालाच्या वाहतुकीस सरकारने परवानगी दिल्याने त्याला संघटनेने हरकत घेतली होती. 15 मार्चनंतर सर्व खनिजमालाची मालकी राज्य सरकारकडे येते, असा दावा संघटनेने केला होता. खाण व्यवसाय आणि खनिज वाहतूक या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असा दावा सरकारकडून केला जात होता. 

15 मार्चनंतर लीज क्षेत्राबाहेरील सुमारे 30 हजार टन खनिजमालाची वाहतूक झाल्याचा दावा करण्यात येत आहे. लीज क्षेत्रात तसेच लीज क्षेत्राच्या बाहेर असलेला खनिजमालही सरकारी मालमत्ता म्हणून जाहीर करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. 

टॅग्स :goaगोवा