शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

बंद मोडून काढण्यासाठी गोव्यात ‘एस्मा’लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 22:28 IST

बुधवारी खाजगी बस वाहतूक, फेरीबोटी, टॅक्सी, रिक्षा, बँका बंदची हाक 

पणजी : कामगार संघटना ९ रोजी भारत बंद पाळणार आहेत. हा बंद यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. गोव्यातील औद्योगिक वसाहती, खाजगी बस वाहतूक, फेरीबोटी, टॅक्सी, रिक्षा, बँका बंद 9 तारखेला बंद राहणार आहेत. सरकारी कर्मचारी संघटनेनेही या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन कर्मचाºयांना केले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीची पावले उचलत सोमवारी अत्यावश्यक सेवा कायदा (एस्मा) लागू केला. आयटक तसेच अन्य कामगार संघटनांनी वेगवेगळ्या शहरांमधील बाजार समित्यांशीही संपर्क साधून बंदमध्ये सहभागी होण्याची हाक दिली आहे. कामगार कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली केंद्र सरकार कामगारविरोधी धोरण राबवित असल्याचा आरोप आहे तर दुसरीकडे मोटर वाहन कायद्यातील दुरुस्तीला वाहतूक क्षेत्रातील व्यावसायिकांचा विरोध आहे. सोमवारी आयटकचे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, अ‍ॅड. राजू मंगेशकर, अ‍ॅड. सुहास नाईक, बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदिप ताम्हणकर यानी पणजीतील बाजारपेठेत फिरुन बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. सायंकाळी पेडणे येथेही त्यांनी भेट देऊन बंदचे आवाहन केले. दहा कामगार संघटनांनी आज आणि उद्या असा दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारलेला आहे. आज सकाळी राजधानी शहरात केवळ मोर्चा काढला जाईल. सर्व कामगार, बँक कर्मचारी यात सहभागी होतील. सकाळी १0 वाजता कदंब बस स्थानकावरुन आझाद मैदानावर हा मोर्चा निघेल आणि तेथे जाहीर सभा होईल. खाजगी बसेस बंद राहणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी कदंब महामंडळाने अतिरिक्त १५0 बसेस रस्त्यावर आणण्याची तयारी केली आहे.        

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरStrikeसंप