शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात अनुदानित दराने सरकारी नारळ विक्री सुरू, मुख्यमंत्र्यांकडून पणजीत उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 13:38 IST

गोव्यात नारळाचे दर खुल्या बाजारात प्रचंड वाढल्यानंतर अनुदानित दराने नारळ विक्री करण्यास सरकारने गुरुवारी (1 फेब्रुवारी) प्रारंभ केला.

पणजी - गोव्यात नारळाचे दर खुल्या बाजारात प्रचंड वाढल्यानंतर अनुदानित दराने नारळ विक्री करण्यास सरकारने गुरुवारी (1 फेब्रुवारी) प्रारंभ केला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजीत तर कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी फातोर्डा येथे नारळ विक्रीला सुरूवात केली. सरकार प्रथम दोन महिनेच नारळ विक्रीचा उपक्रम राबवेल. तोपर्यंत जर खुल्या बाजारात नारळाची किंमत कमी झाली नाही तर, मग पुढील निर्णय घेता येईल, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी नारळ विक्रीला आरंभ केल्यानंतर आल्तिनो येथे पत्रकारांना सांगितले.

घाऊक पद्धतीने नारळ खरेदी केल्यानंतर जो दर लावला जातो, त्या दराने आम्ही ग्राहकांना नारळ देऊ. महागाई कमी होईपर्यंत तरी ही विक्री सुरू ठेवावी लागेल. तथापि, अगोदर दोन महिने योजना सुरू ठेवून पाहूया, असे मुख्यमंत्री म्हणाले. गोवा फलोत्पादन विकास महामंडळाची राज्यभर दालने आहेत. गुरुवारी फक्त दोन दालनांमधून अनुदानित दराने नारळ विक्री सुरू झाली. टप्प्याटप्प्याने अन्य दालनांमधूनही नारळ विक्री करण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले आहे. नारळाच्या आकारानुसार 15, 18 आणि 20 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. एका कुटुंबाला 15 दिवसांसाठी 15 दिले जाणार आहेत. त्यासाठी ग्राहकाने एलपीजी गॅस सिलिंडरचे कार्ड घेऊन येणो बंधनकारक आहे. हे कार्ड दाखविल्यानंतर नारळ कमी दराने दिले जातील. 

मुख्यमंत्री म्हणाले, की गोव्यातील सत्तरी, डिचोली, काणकोण, सांगे अशा तालुक्यांध्ये नारळाचे उत्पादन घटले, कारण माकड व खेत्यांनी उच्छाद मांडला आहे. उपद्रवी प्राण्यांमुळे नारळ उत्पादन कमी झाले. दरम्यान, माईट रोगामुळेही नारळाचे उत्पादन कमी झाल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. 

पणजीत फलोत्पादन महामंडळाच्या दालनामधून अनुदानित दराने नारळ विक्री सुरू झाल्याचे कळून येताच मोठय़ा संख्येने नागरिकांनी प्रतिसाद दिला. एलपीजी गॅस सिलिंडरचे कार्ड घेऊन अनेक नागरिक आले. मुख्यमंत्री र्पीकर यांच्या हस्ते त्यांना नारळ देण्यात आले. यावेळी मंत्री जयेश साळगावकर, आमदार प्रविण झाटय़े, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर, व्यवस्थापकीय संचालक श्री. केळकर आदी उपस्थित होते.  महिला काँग्रेसनेही गेले काही दिवस कमी दरात राज्यभर नारळ विक्री केली व सरकार लोकांसाठी काहीच करत नसल्याची टीका केली होती.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा