शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गोवा सरकार गोरक्षकांच्या दबावाखाली, कॉंग्रेस नेत्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 21:44 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरस्कृत गोरक्षकांच्या दबावामुळे गोव्यात बीफचा तुटवडा असतानाही सरकार निष्क्रिय राहिल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते फ्रान्सिस्क सार्दीन यांनी केला आहे.

पणजी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरस्कृत गोरक्षकांच्या दबावामुळे गोव्यात बीफचा तुटवडा असतानाही सरकार निष्क्रिय राहिल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते फ्रान्सिस्क सार्दीन यांनी केला आहे. सरकारने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.गोव्यात बीफचा तुडवडा हा निर्माण झालेला तुटवडा हा नैसर्गिक नसून कृत्रिम असल्याचा दावा सार्दीन यांनी केला आहे. हे कारस्थान गोरक्षकांनी केले असून त्यांचा अजेंडा लादण्याचा हा प्रयत्न आहे आणि सरकार त्यांना साथ देत आहे, असे त्यांनी सांगितले. गोवा मांस प्रकल्पातही या लोकांची दहशत आहे. बीफ विक्रेत्यांनाही ते दहशतीत ठेवतात आणि बीफ खाणा-यांंवरही दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.गोव्यासारख्या पर्यटकांचा ओढा मोठ्या प्रमाणावर असलेल्या राज्यात बीफची मागणीही मोठ्या प्रमाणावर आहे. बीफ समस्यामुळे पर्यटन व्यवसायावरही परिणाम होत आहे. एखाद्या वस्तुचा पुरवठा कमी झाला की ती वस्तु महागते आणि एकदा वर गेलेल्या किमती कधी खाली येत नसतात. त्यामुळे सरकारने त्वरित कारवाई करून समस्या निवारण करण्याची ही वेळ आहे, असे ते म्हणाले.राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने आतापर्यंत एकही निर्णय जनहिताचा घेतलेला नाही. जीएसटी लागू करून महागाई वाढविली. लोकोपयोगी वस्तुंवर मोठ्या प्रमाणात कर लागू करण्यात आला. नंतर जनतेचा संताप अनावर झाल्यामुळे ब-याच वस्तू या कमी कराच्या गटात आणाव्या लागल्या. परंतु त्यामुळे वाढलेल्या किमती मात्र खाली आलेल्या नाहीत. बीफचेही तसेच होण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला.बीफचा प्रश्न ऐरणीवर आला असताना मुख्यमंत्र्यांनी कोणतीही भुमिका न घेता समस्या ताठकळत ठेवल्यास जनक्षोभ उसळेल. कॉंग्रेस पक्ष त्यासाठी आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या बरोबर कॉंग्रेसचे प्रधान सरचीटणीस आल्तिन गोम्स आणि उत्तर गोवा कॉंग्रेस अध्यक्ष विजय बी के उपस्थित होते.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघgoaगोवा