शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

वारसा स्थळे दत्तक देण्याच्याबाबतीत गोवा सरकार पूर्णपणे अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 18:00 IST

ओल्ड गोवा येथील प्रसिद्ध बॉम जिजस बासिलिका चर्चसह गोव्यातील सहा महत्वाची वारसा स्थळे केंद्र सरकारच्या ‘वारसा स्थळे दत्तक घेणो’ या योजनेखाली खासगी आस्थापनाकडे देण्याच्या निर्णयाने गोव्यात खळबळ माजली आहे.

 मडगाव  - ओल्ड गोवा येथील प्रसिद्ध बॉम जिजस बासिलिका चर्चसह गोव्यातील सहा महत्वाची वारसा स्थळे केंद्र सरकारच्या ‘वारसा स्थळे दत्तक घेणे’ या योजनेखाली खासगी आस्थापनाकडे देण्याच्या निर्णयाने गोव्यात खळबळ माजली आहे. हा निर्णय घेताना केंद्र सरकारने गोवा सरकारला पूर्णत: अंधारात ठेवले अशी प्रतिक्रिया पुरातत्व खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.

वास्तविक ‘असे महत्वाचे निर्णय घेताना, स्थानिक सरकारला विश्वासात घेणो गरजेचे होते. मात्र केंद्र सरकारने आम्हाला पूर्णत: अंधारात ठेवले.’ अशी प्रतिक्रिया मंत्री विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली. केंद्राच्या या निर्णयाबद्दल शंका व्यक्त करताना, ही स्थळे नेमकी कशासाठी खासगी आस्थापनाकडे दिली जातात याची पूर्ण माहिती स्थानिक सरकारला असणो आवश्यक असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.या चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस झेवियरचे पवित्र अवशेष ठेवण्यात आले असून या स्थळाला केवळ वारसा महत्वच नसून धार्मिक महत्वही आहे. या चर्चशी लोकांच्या धार्मिक भावना गुंतल्या आहेत. त्यामुळे असे निर्णय घेताना आवश्यक असलेली संवेदनशीलता घेतली गेली नाही असे सरदेसाई म्हणाले. या संदर्भात पुढील निर्णय घेण्यासाठी पर्यटनमंत्री बाबु आजगावकर, स्थानिक आमदार असलेले मंत्री पांडुरंग मडकईकर, चर्चचे पदाधिकारी, मुख्य सचिव तसेच पुरातत्व खात्याच्या अधिका-यांची बैठक येत्या आठवडय़ात घेऊन राज्य सरकार आपला निर्णय केंद्र सरकारला कळविणार असे सरदेसाई यांनी सांगितले. गोव्यातील वारसा स्थळे खासगी आस्थापनांच्या हाती देण्यास यापूर्वी आम आदमी पक्षाने विरोध केला आहे. वारसाप्रेमींनीही केंद्राच्या या निर्णयाबद्दल साशंकता व्यक्त केली आहे.

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकारnewsबातम्या