लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'गोव्याला घटक राज्याचा दर्जा देण्यात आणि कोंकणी भाषेला आठव्या परिशिष्टात आणण्यात माजी पंतप्रधान राजीव गांधी याचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे गोमंतकीय त्यांचे हे गोव्यासाठी अनमोल कार्य कधीच विसरणार नाही' असे गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.
बुधवारी काँग्रेस कार्यालयात राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार कार्ल्स फरेरा व इतर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार कार्ल्स फेरेरा यांनी देशाच्या विकासाच्या विकासात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मोठा वाटा आहे असल्याचे सांगितले.
अमित पाटकर म्हणाले, 'माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे गोव्यावर खूप प्रेम होते. म्हणून ते गोव्यात यायचे. त्यांनी राज्याला घटक राज्याचा दर्जा दिला. पण आताच्या भाजप सरकारने हुकूमशाही राजवट चालवली आहे. सर्वसामान्य माणसांचे हक्क दाबले जात आहेत. शेतकऱ्यांचे अधिकार दाबले जात आहेत. लोकांचा आवाज दाबला जातो. त्यामुळे या सरकारला जनतेने धडा शिकविला पाहिजे.