शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
2
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
3
"कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
4
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
5
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
6
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
7
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
8
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
9
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
10
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
11
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
12
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
13
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
14
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
15
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
16
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
17
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
18
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
19
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
20
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल

गोव्यात मंत्र्यांना मिळाली पूर्वीचीच खाती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 5:35 AM

पर्रीकर मंत्रिमंडळ अस्तित्वात असताना सर्व मंत्र्यांना जी खाती दिली गेली होती, तीच खाती आता विद्यमान मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांना मिळणार आहेत.

पणजी : पर्रीकर मंत्रिमंडळ अस्तित्वात असताना सर्व मंत्र्यांना जी खाती दिली गेली होती, तीच खाती आता विद्यमान मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांना मिळणार आहेत. त्याविषयीची अधिसूचनाही राज्यपालांकडून मान्य होऊन आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून ही माहिती गुरुवारी प्राप्त झाली.खातेवाटप न झाल्याने त्याविषयी मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. खातेवाटपासाठी विलंब का झाला ते काही मंत्र्यांना कळत नाही. कायदा खात्याकडे मुख्यमंत्र्यांनी फाइल पाठवली होती, अशीही चर्चा अधिकाऱ्यांच्या पातळीवर होती. या पार्श्वभूमीवर या प्रतिनिधीने मुख्यमंत्री सावंत यांना विचारले असता, ते म्हणाले की, सर्व मंत्र्यांना पूर्वीचीच खाती द्यावीत, असा निर्णय झालेला आहे. पर्रीकर मंत्रिमंडळ अधिकारावर असताना मंत्र्यांकडे जी प्रत्येकी तीन खाती होती, तीच खाती दिली जातील. त्याबाबतचे सगळे सोपस्कार आपण पार पाडले आहेत. आपण अधिसूचनेसाठी फाइल राज्यपालांकडे पाठवली व राज्यपालांकडूनही ती मंजूर होऊन आली. शुक्रवारी अधिसूचना बाहेर येईल व सर्व मंत्र्यांना त्या वेळी अधिसूचनेची प्रत मिळेल.विजय सरदेसाई यांच्याकडे नगर नियोजन, मिलिंद नाईक यांच्याकडे नगरविकास, सुदिन ढवळीकर यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, माविन गुदिन्हो - पंचायत, बाबू आजगावकर - पर्यटन, नीलेश काब्राल - वीज, जयेश साळगावकर - गृहनिर्माण, विनोद पालयेकर - जलसंसाधन, रोहन खंवटे - महसूल, गोविंद गावडे - कला व संस्कृती, विश्वजीत राणे - आरोग्य अशा पद्धतीने खातेवाटप होणार आहे. याशिवाय पूर्वी जी अन्य दोन किंवा तीन खाती मंत्र्यांकडे होती, तीही त्यांना दिली जातील. याचा अर्थ असा की, मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे अर्थ, गृह, पर्सनल, खाण, वन, पर्यावरण, शिक्षण, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, उद्योग अशी अनेक महत्त्वाची खाती असतील.मंत्र्यांची खातीमुख्यमंत्री सावंत - अर्थ, गृह, पर्सनल, उद्योग, खाण, वन, शिक्षण, पर्यावरणसुदिन ढवळीकर - सार्वजनिक बांधकाम, वाहतूक, नदी परिवहन व म्युझियमविजय सरदेसाई - नगर नियोजन, कृषी, पुरातत्त्व, कारखाने व बाष्पकबाबू आजगावकर - पर्यटन, क्रीडा, प्रिंटिंग अ‍ॅण्ड स्टेशनरीरोहन खंवटे - महसूल, आयटी, रोजगार व मजूरविश्वजीत राणे - आरोग्य, अन्न व औषध प्रशासन, क्राफ्टमन ट्रेनिंगगोविंद गावडे - अनुसूचित जमाती कल्याण, कला व संस्कृती, नागरी पुरवठामाविन गुदिन्हो - पंचायत, शिष्टाचार, पशूसंवर्धनजयेश साळगावकर - गृहनिर्माण, बंदर कप्तान, आरडीएविनोद पालयेकर - जलसंसाधन, मच्छीमार, वजन व माप खातेनीलेश काब्राल - वीज, सौर ऊर्जा, कायदा व न्यायमिलिंद नाईक - समाज कल्याण, नगर विकास

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा