शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला पाठिंब्याचा गोवा फॉरवर्डचा निर्णय; फोंडा पोटनिवडणुकीबाबत बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:21 IST

आघाडीचा भाग म्हणून गोवा फॉरवर्ड स्वतःचा उमेदवार उभा करणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: फोंडा मतदारसंघातील आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही काँगेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीचा भाग म्हणून गोवा फॉरवर्ड स्वतःचा उमेदवार उभा करणार नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते, दुर्गादास कामत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रशांत नाईक, मोहनदास लोलयेकर आदी उपस्थित होते.

दुर्गादास कामत म्हणाले, 'ही निवडणूक राज्याची राजकीय दिशा ठरवणारी आहे, त्यामुळे सर्व विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. भाजपला पराभूत करणे हाच आमचा उद्देश आहे. याअनुषंगाने आम्ही पोटनिवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देत आहोत. 

प्रशांत नाईक म्हणाले, 'पक्ष राज्यभर संघटन मजबुतीवर भर देत आहे. अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला व्यापक जनसमर्थन मिळत असून भविष्यात अधिक बळकट राजकीय पर्याय म्हणून उदयास येण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

मोहनदास लोलयेकर म्हणाले, 'आम्ही काँग्रेसला या निवडणुकीत पाठिंबा देत असलो तरी राज्यातील खरा विरोधी पक्ष गोवा फॉरवर्ड पक्षच आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विजय सरदेसाई यांनी विविध लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडले.

जनतेमध्ये त्यांना विरोधी पक्षनेत्यासारखी मान्यता मिळत आहे. यंदा पक्षाच्या स्थापनेच्या १० वर्षपूर्तीनिमित्त ३० मे रोजी लोहिया मैदान येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभर २५ मतदारसंघात समित्या सक्रिय आणि भक्कम करण्याचा निर्णय आम्हीं घेतला आहे. पुढील काळात त्याची तयारी केली जाईल.

समित्या भक्कम करणार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी काही महिन्यांत राज्यातील २५ ते ३० मतदारसंघात गोवा फॉरवर्डची कार्यकारिणी समिती भक्कम केली जाणार आहे. त्यामुळे शक्य असल्यास २५ मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करू शकतो. आम्ही राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच घेतली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पक्ष बळकटीच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला. आगामी पालिका निवडणुकीसाठीदेखील आम्ही तयारीला लागलो आहोत, अशी माहिती मोहनदास लोलयेकर यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Forward supports Congress for Fonda by-election, meeting decision.

Web Summary : Goa Forward will support Congress in the upcoming Fonda by-election to defeat BJP. They won't field their own candidate. The party aims to strengthen its organization across the state and prepare for future elections, focusing on public welfare issues.
टॅग्स :goaगोवाElectionनिवडणूक 2026