शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Goa: गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट स्थापन ; प्रदेशाध्यक्षपदी शंभू मधुकर परब 

By किशोर कुबल | Updated: October 3, 2023 15:01 IST

Goa: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट गोव्यात स्थापन झाला असून प्रदेशाध्यक्षपदी शंभू मधुकर परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- किशोर कुबल पणजी - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट गोव्यात स्थापन झाला असून प्रदेशाध्यक्षपदी शंभू मधुकर परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काल नियुक्तीचा आदेश काढला. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर गोव्यात काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी गोव्यात पक्ष एकसंध असल्याचा दावा करून सर्वजण शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले होते

गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून आलबेल नव्हतेच. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पक्षाच्या कोणत्याही हालचाली दिसत नव्हत्या. फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने अकरा उमेदवार उभे केले परंतु एकालाही विजयी प्राप्त करता आला नाही. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर गोव्यात पक्षाचे काम पूर्णपणे थंडावले होते. या पार्श्वभूमीवर अजित पवार गट गोव्यात दाखल झाल्याने आता राजकारणाला नवी गती येईल.

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा  यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'शंभू परब हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात कारकून म्हणून काम करत होते. प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना अध्यक्ष बनवले, त्यामुळे त्यांचे कौतुकच करावे लागेल. मी शरद पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष असून शंभू यांच्या नियुक्तीबद्दल मला फारसे काही बोलायचे नाही. माझी नियुक्ती शरद पवार यांनी अध्यक्ष म्हणून केलेली आहे आणि आमचे काम चालू आहे. गुरुवारी शरद पवार यांनी सर्व प्रदेशाध्यक्ष, पक्षाचे खासदार, आमदार यांची दिल्लीत बैठक बोलावली असून या बैठकीसाठी मी दिल्लीला जाणार आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसgoaगोवा