शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

गोव्यात मासेमारीवर परिणाम, समुदात पाणीपातळी वाढल्याने मच्छिमारांमध्ये भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 13:58 IST

खोल समुद्रात घोंघावत असलेले चक्रीवादळ तसेच पाण्याची पातळी वाढल्याने मच्छिमारी ट्रॉलर किनाऱ्यावर परतले असून गोव्यात मासेमारी ठप्प झाली आहे. हवामान वेधशाळेने मच्छिमारांना सतर्कतेचा आदेश दिला आहे.

पणजी : खोल समुद्रात घोंघावत असलेले चक्रीवादळ तसेच पाण्याची पातळी वाढल्याने मच्छिमारी ट्रॉलर किनाऱ्यावर परतले असून गोव्यात मासेमारी ठप्प झाली आहे. हवामान वेधशाळेने मच्छिमारांना सतर्कतेचा आदेश दिला आहे. बुधवारी खास करून दक्षिण गोव्यातील अनेक किनाऱ्यावर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे घबराट निर्माण झाली. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या लुबान या चक्रीवादळाचा हा परिणाम होता. यामुळे मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हवामान वेधशाळेने या वादळाच्या पार्श्‍वभूमीवर मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी न देण्याचा इशारा दिला आहे. तो आधी १२ ऑक्टोबरपर्यंत होता, परंतु आता आणखी दोन दिवसांनी मुदत वाढवण्यात आली असून १४ ऑक्टोबरपर्यंत हा इशारा कायम आहे. हवामान वेधशाळेचे संचालक एम. एल. साहू यांच्या म्हणण्यानुसार या वादळाची तीव्रता कमी होत जाणार आहे.

गोव्यातील सर्वात मोठी मच्छिमारी जेटी असलेल्या मालिम जेटीवरील ट्रॉलरमालक तथा मांडवी फिशरमेन्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी अध्यक्ष सीताकांत परब म्हणाले की, हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यावरुन गेल्या ७ ऑक्टोबरपासून मच्छीमारी ट्रॉलर बंद आहेत. सुमारे ७० टक्के ट्रॉलर्स जेटीवर नांगर टाकून आहेत. जे काही ट्रॉलर्स खोल समुद्रात मासेमारीसाठी गेले होते ते मुरगाव बंदरात किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी नांगर टाकून आहेत. मासेमारी ठप्प झाल्याने जेटीवर मासळीची आवक फारच घटली आहे.

चक्रीवादळ खोल समुद्रात घोंघावत असले तरी किनाऱ्यावर त्याचा परिणाम जाणवत आहे. किनाऱ्यावर भरतीच्या वेळी आणि ओहोटीच्या वेळी पाण्याचा प्रवाह प्रचंड असतो. त्यामुळे  यांत्रिकी होड्यांद्वारे केली जाणारी मच्छिमारीही ठप्प झाली आहे. भरतीच्या वेळी किनाऱ्यावर मोठ्या लाटा दिसून येतात. पाण्याची पातळी अधून मधून वाढलेली असते. पुढील दोन दिवस मासेमारी शक्य नाही हवामान वेधशाळेने येत्या रविवार १४ ऑक्टोबरपर्यंत मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मालिम व्यतिरिक्त कुटबण, शापोरा, कुठ्ठाळी, वास्को, बेतुल या ठिकाणीही मोठ्या मच्छिमारी जेटी आहेत तेथेही मासेमारी ठप्प झाली आहे

टॅग्स :goaगोवाFishermanमच्छीमार