शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Goa: तोतया आई- मुलाला बनावट पासपोर्टसहीत पकडले, यूएईला जाण्याचा करित होते प्रयत्न

By पंकज शेट्ये | Updated: August 24, 2023 17:16 IST

Goa: गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून बनावट पासपोर्टच्या आधारे युएई ला (युनायटेड अरब अमिरात) जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तोतया आई - मुलाला दाबोळी विमानतळ पोलिसांनी गुरूवारी (दि.२४) ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला.

- पंकज शेट्ये वास्को - गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून बनावट पासपोर्टच्या आधारे युएई ला (युनायटेड अरब अमिरात) जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तोतया आई - मुलाला दाबोळी विमानतळ पोलिसांनी गुरूवारी (दि.२४) ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. बनावट पासपोर्ट घेऊन विदेशात जाण्याच्या प्रयत्नात असलेले तोतया आई - मुलगा गुजरात येथील असल्याची माहीती दाबोळी विमानतळ पोलीसांना चौकशीत प्राप्त झाली.

दाबोळी विमानतळ पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार बुधवारी मध्यरात्रीनंतर १२.०५ च्या सुमारास तो प्रकार उघडकीस आला. दाबोळी विमानतळावरून एअर इंडीया एक्सप्रेस विमानाने युएई जाण्याच्या प्रयत्नात असलेला यशकुमार पटेल (वय १८, रा: अहमदाबाद, गुजरात) आणि रश्मीका चौधरय्या (वय ३३, रा: गांधीनगर, गुजरात) यांचा इमीग्रेशन विभागाने पासपोर्ट तपासला असता त्यांचे पासपोर्ट बनावट असल्याचे उघड झाले. यशकुमार आणि रश्मीका यांनी तेथे मुलगा - आई असल्याचे सांगून बनावट पासपोर्टच्या आधारे विदेशात जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे तेथे झालेल्या चौकशीत उघड झाले. त्या दोघांनीही दुस-यांच्या पासपोर्टवर त्यांचा फोटो लावून आणि अन्य अयोग्य प्रकार करीत बनावट पासपोर्ट बनवून ते विदेशात जाण्याचा प्रयत्नात असल्याचे चौकशीत उघड झाले.

यशकुमार आणि रश्मीका बनावट पासपोर्ट घेऊन विदेशात जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाल्यानंतर पुनीत वजीर यांनी दाबोळी विमानतळ पोलीसांना लेखी तक्रार दिली. पोलीसांनी तक्रारीची दखल घेत यशकुमार आणि रश्मीका यांच्याविरुद्ध भादस ४६८, ४७१, ४१९, ४२० आरडब्ल्यु ३४ कलमाखाली आणि पासपोर्ट कायदा १९६७ च्या १२ कलमाखाली गुन्हा नोंद करून दोघांनाही ताब्यात घेतले. गुजरातहून गोव्यात आल्यानंतर दाबोळी विमानतळावरून बनावट पासपोर्ट घेऊन विदेशात जाण्याचा प्रयत्नात असलेल्या त्या दोघांनीही ते बनावट पासपोर्ट कुठे बनवले त्याबाबत पोलीसांकडून चौकशी चालू आहे. दाबोळी पोलीस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक संतोष गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे. 

टॅग्स :goaगोवाpassportपासपोर्टCrime Newsगुन्हेगारी