शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

गोव्यात इफ्फीचे आयोजन पुढे ढकलले, नोव्हेंबरऐवजी जानेवारीत महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 18:53 IST

कोविड संकटामुळे नोव्हेंबरमध्ये इफ्फी होणार नाही हे गुरुवारी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.

पणजी : सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन लांबणीवर टाकले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये यंदाचा इफ्फी होणार नाही. हा महोत्सव पुढील वर्षी जानेवारी महिन्यात 16 ते 24 या कालावधीत होणार आहे. एरव्ही  20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत इफ्फीचे आयोजन केले जात असते. पण यावर्षी कोविड संकटामुळे नोव्हेंबरमध्ये इफ्फी होणार नाही हे गुरुवारी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले. निर्णय घेण्यापूर्वी जावडेकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली.गोव्यात कोविडचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. रोज पाचशे ते सहाशे नवे रुग्ण आढळतात व आठ ते नऊ जणांचा बळी जातो. या पार्श्वभूमीवर गोव्यात यंदा नोव्हेंबरमध्ये 51वा इफ्फी आयोजित करता येणार नाही, याची कल्पना जावडेकर यांना आली. जानेवारीत गोव्यातच इफ्फी होईल पण हायब्रीड आणि प्रत्यक्षात अशा स्वरूपात तो होणार आहे. कोविडशीसंबंधित सर्व सूचना व प्रक्रियेचे इफ्फीवेळी पालन केले जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. गोवा मनोरंजन संस्थेने यापूर्वी नोव्हेंबरमध्ये व्हर्च्युअल इफ्फी होईल, असे म्हटले होते.मात्र केंद्राने इफ्फीचे आयोजन पुढे ढकलले. येथील आयनॉक्स मल्टिप्लेक्सचे पूर्णपणे नूतनीकरण करण्याचे काम सुरू आहे. डिसेंबरपर्यंत मल्टिप्लेक्स सज्ज होणार आहे. गेल्यावर्षी पन्नासावा इफ्फी गोव्यात पार पडला. इफ्फीसाठी दोनापावल येथे नवा मल्टिप्लेक्स बांधणे, कनवेनशन सेंटरची सोय करणे किंवा इफ्फीसाठी अन्य सुविधा निर्माण करणे गोवा सरकारला गेल्या दोन वर्षांत शक्य झाले नाही याची कल्पना केंद्र सरकारला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा