शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Goa: फिल्म सिटीसाठी ईएसजी लीजवर जागा घेणार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 16:06 IST

Goa News: गोव्यात फिल्म सिटी प्रकल्प आणण्यासाठी कोमुनिदादची जागा उपलब्ध आहे. तसेच गोवा मनोरंजन संस्था लीजवरही जागा घेऊ शकते, तेथेच कन्व्हेन्शन सेंटरही उभारले जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

- नारायण गावस पणजी - गोव्यात फिल्म सिटी प्रकल्प आणण्यासाठी कोमुनिदादची जागा उपलब्ध आहे. तसेच गोवा मनोरंजन संस्था लीजवरही जागा घेऊ शकते, तेथेच कन्व्हेन्शन सेंटरही उभारले जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. इफ्फी निमित्त गोवा मनोरंजन संस्थेमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बाेलत होते. यावेळी गाेवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होत्या.

गाेव्यात गेली २० वर्षे इफ्फी महोत्सव हाेत आहे. पण गाेव्यात अजून  चित्रपटांशी निघडीत मोठे प्रकल्प झाले नाही पण आता गाेव्यात फिल्मसिटी उभारण्याचा निर्णय झाला असून लवकरच जागाही निवडली जाणार आहे. फिल्मसिटी झाली तर अनेक गोमंतकीयांना रोजगारही मिळणार आहे. तसेच गोमतंकीय चित्रपटांना चांगला वाव मिळणार आहे. त्याचप्रमाणे गाेमंतकीय कलाकारांना योग्य असे व्यासपिठ मिळणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

७ गोमंतकीय चित्रपटांची निवडयंदाच्या इफ्फीत २० गाेमंतकीय चित्रपटांच्या इफ्फीसाठी प्रवेशिका सादर करण्यात आल्या होत्या. यातील ७ चित्रपटांची निवड झाली  आहे. ही आम्हा गाेमंतकीयांसाठी अभिमानची बाब आहे. गोव्याचा चित्रपट आता आंतराष्ट्रीय  पातळीवर झळकत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

सायं. ५ वा. उद्घाटनइफ्फीचा उद्घाटन  साेहळा हा तालीगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर हाेणार असून सायं. ५ वा. या महोत्सवाचे उद्घाटन हाेणार आहे. या उद्घाटनाला ईएसजीकडून प्रवेश पास घेऊन लोकांनी उपस्थिती लावून या सोहळ्याचा ाआनंद घ्यावा असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रवेश योग्य बनविणार राज्यातील  दिव्यांगाना या इफ्फीत याेग्यरीत्या प्रवेश  करायला मिळावा यासाठी इफ्फीची सर्व ठिकाणे प्रवेश याेग्य केली जाणार आहेत.  यासाठी अशी साेय केली जाणार आहे. जेणेकरुन कुणालाच या महोत्सवाचा आस्वाद घेताना कमतरता भासणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ज्या लोकांनी प्रतिनिधी नाेंदणी केेली नाही त्यांच्यासाठी बाहेर विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यंदा मिरामार िबीच तसेच मडगाव रविंद्र भवन तसेच हणजूण बीच येथे ओपन स्क्रीन लावण्यात येणार आहे.  तसेच दर्यासंगमावर विविध दालने उभारण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाIFFIइफ्फीPramod Sawantप्रमोद सावंत