शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकांच्या विषयावरून सरकारमध्ये मगोपची अडचण शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 11:59 IST

गोव्यात विधानसभेच्या दोन मतदारसंघांमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकांवेळी भाजपाच्या उमेदवारांविरुद्ध मगोपने उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सत्ताधारी आघाडीत संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील भाजपाप्रणीत सत्ताधारी आघाडीचा महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) हा प्रमुख घटक पक्ष आहे.गोव्यात विधानसभेच्या दोन मतदारसंघांमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकांवेळी भाजपाच्या उमेदवारांविरुद्ध मगोपने उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सत्ताधारी आघाडीत संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.संघर्षात मगो पक्षाची मोठी अडचण होऊ शकते, अशी माहिती मिळते.

पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील भाजपाप्रणीत सत्ताधारी आघाडीचा महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) हा प्रमुख घटक पक्ष आहे. तथापि, गोव्यात विधानसभेच्या दोन मतदारसंघांमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकांवेळी भाजपाच्या उमेदवारांविरुद्ध मगोपने उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सत्ताधारी आघाडीत संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. या संघर्षात मगो पक्षाची मोठी अडचण होऊ शकते, अशी माहिती मिळते.

पर्रीकर हे आजारी असले तरी, भाजपाविरुद्ध पोटनिवडणूक लढविण्याची मगोपची भूमिका मुख्यमंत्र्यांनाही आवडलेली नाही अशी चर्चा मंत्रिमंडळात सुरू आहे. गोवा फॉरवर्ड हाही पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. पर्रीकर यांनी मगो पक्षाच्या नेत्यांशी बोलून मगोपचे मन वळवावे व पोटनिवडणुका लढविण्यापासून मगोपला रोखावे अशी भूमिका गोवा फॉरवर्ड पक्षाने मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासमोर मांडली आहे. गोविंद गावडे हे पर्रीकर सरकारमध्ये कला व संस्कृती खात्याचे मंत्री आहेत. त्यांनीही जाहीरपणे मगोपच्या भूमिकेला आक्षेप घेतला आहे. मगो पक्ष सरकारमध्ये राहतो व भाजपाच्या उमेदवारांविरुद्ध पोटनिवडणुकही लढवू पाहतो ही स्थिती परस्पर विरोधी असून आम्हाला हे मान्य नाही असे मंत्री गावडे यांनी यापूर्वी म्हटले आहे. 

शिरोडा व मांद्रे या दोन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सांगितले की, मगो पक्षावर भाजपाचा पूर्ण विश्वास आहे. मगोपच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्री पर्रीकर हे चर्चा करतील व मगोपला पोटनिवडणुका लढवू नये अशी विनंती करतील. मगो पक्ष निश्चितच ऐकेल. महाराष्ट्रात शिवसेनेनेही अगोदर भाजपाविरुद्ध ताठर भूमिका घेतली होती व मग युती केली.

मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी मात्र मगो पक्ष पोटनिवडणुकांमधून माघार घेणार नाही असे सांगितले. आम्ही पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारसोबतच आहोत. तथापि, गद्दार व फुटीरांना धडा शिकवायला हवा म्हणून मगो पक्ष पोटनिवडणुका लढवत आहे, असा दावा ढवळीकर यांनी केला.

मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर हे नुकतेच मुख्यमंत्री पर्रीकर यांना भेटले. मात्र पोटनिवडणुकांविषयी  पर्रीकर यांच्याशी काही चर्चा झाली नाही, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. मात्र काही मंत्र्यांच्या मते पोटनिवडणुकांच्या विषयावरून सरकारमधून बाहेर पडण्याची वेळ मगोपवर येऊ शकते.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपा