शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022 : नरेंद्र मोदी यांच्याकडून आम्हाला व शरद पवारांना चांगुलपणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही - नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 20:07 IST

महाराष्ट्रातील सरकारने पहाटे शपथविधी केला नाही, पटोले यांचा टोला

गणेश तारळेकरपणजी :  "आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काेणत्याही चांगुलपणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, ना शरद पवारांना प्रमाणपत्र गरजेचे आहे," असे परखड मत काँगेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. संसदेत नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांची केलेली स्तुती आणि काँग्रेसवर केलेल्या टीकेसंदर्भात विचारले असता त्यांनी मत मांडले. त्यांनी पणजी लोकमत कार्यालयाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. 

देशाचे पंतप्रधान अशाप्रकारे भाषण करु शकतात, यावर विश्वास बसत नाही. देशासमोर बेरोजगारी, कोरोना, कमी होत असलेला विकासदर यावर त्यांनी भाष्य करायला हवे होते, विकासावर बोलायला हवे होते. मात्र एखाद्या टपरीवर चर्चा व्हावी, याप्रमाणे त्यांनी भाषण केले. प्रत्येकवेळी भाषणात पं.नेहरु, इंदिरा गांधी यांच्या नावाचा उल्लेख करुन जनतेची दिशाभूल मोदी करत आहेत. सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे मोदी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचेही पटोले म्हणाले. 

महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीनं काम"महाराष्ट्रात आम्ही चांगल्या पद्धतीने काम करत आहाेत. कुणी काहीही वक्तव्ये केली तरी त्याचा आमच्यावर काहीच फरक पडत नाही," असेही मत पटोले यांनी मांडले. आमचे महाराष्ट्रातील सरकार हे कॉमन मिनीमम प्रोगॅमनुसार अस्तित्वात आले आहे. सकाळच्या वेळी शपथ घेऊन आमचे सरकार तयार झाले नाही. सरकारमध्ये समावेश असलेल्या तिन्ही पक्षात सामंजस्य असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेही उपस्थित होते.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Nana Patoleनाना पटोलेNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवार