शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Goa Election 2022: दोन मित्र तिसऱ्यांदा आमने-सामने; लढतीचे सध्याचे चित्र अस्पष्ट, मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 10:58 IST

Goa Election 2022: या निवडणुकीत इतिहास घडणार की बदलणार, कोण बाजी मारणार याकडे मतदारांसंह राजकीय निरीक्षकांचेही लक्ष लागले आहे.

निवृत्ती शिरोडकर, लोकमत न्यूज नेटवर्क

पेडणे : संपूर्ण गोमंतकीयांचे  दर निवडणुकीत लक्ष वेधून घेणारा मतदारसंघ म्हणून पेडणे तालुक्यातील  मांद्रे मतदारसंघाकडे पाहिले जाते. कारण या मतदारसंघाने दोन वेगवेगळ्या पक्षांचे मुख्यमंत्री  राज्याला दिले. तसेच येथून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मंत्री झालेली व्यक्ती त्यानंतरच्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा निवडून आलेली नाही, असा या मतदारसंघाचा आजावरचा इतिहास आहे.  हा इतिहास बदलण्यासाठी आता भाजपमध्ये ३२ वर्षांपासून कार्यरत असलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे अपक्ष म्हणून यावेळी निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे  त्यांचा सामना एकेकाळी मित्र असलेल्या आमदार दयानंद सोपटे यांच्याशी होणार आहे.

माजी मुख्यमंत्री पार्सेकर आणि सोपटे या निमित्ताने तिसऱ्यांदा एकमेकांच्या विरोधात उभे असलेले दिसणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतो याकडे मतदारांबरोबच राजकीय निरीक्षकांचेही लक्ष लागलेले असणार आहे. पार्सेकर (भाजप) आणि सोपटे (काँग्रेस) हे यापूर्वी २०१२ व २०१७ च्या निवडणुकीत आमने-सामने आले होते. २०१२ मध्ये पार्सेकर यांनी सोपटेंना, तर २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सोपटे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवत भाजप उमेदवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री पार्सेकर यांचा पराभव केला होता.

या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा हे दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे राहणार आहेत. यावेळी एकेकाळी पार्सेकर यांचे समर्थक असलेले दीपक कळंगुटकर हेही गोवा फॉरवर्डकडून फॉरवर्ड-काँग्रेस युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात राहणार आहेत. तेही पार्सेकर आणि सोपटे यांच्या मतांची विभागणी करणार आहेत, तर दुसऱ्या बाजूने काँग्रेसला ही जागा न मिळाल्याने रमाकांत खलप, माजी मंत्री संगीता परब, युवा नेते सचिन परब नाराज झाले आहेत. ते युतीच्या उमेदवाराला काम करतील की पार्सेकर यांना मदत करतील हेही पाहण्यासारखे असणार आहे. ऐनवेळी कळंगुटकर यांचे समर्थक पार्सेकर यांच्या बाजूने तर जाणार नाहीत ना ? अशी शंका निर्माण होत आहे. कारण पार्सेकर आणि कळंगुटकर यांचे समर्थक हे एकमेकांचे समर्थक आहेत. त्यामुळे या सर्वांमध्ये सामन्या काऱ्यकर्ता आणि समर्थक यांचीही नेमकी कोणाची बाजू घ्यावी यावरुन  कसोटी लागणार आहे.  

बहुरंगी लढतीची अपेक्षा

मांद्रे मतदारसंघातून सध्यातरी आमदार दयानंद सोपटे यांनी पक्षाच्या समर्थकांना सोबत घेऊन कार्यरत आहेत. येथे मगोप विरुद्ध भाजप अशी सरळ लढत दिसत होती; परंतु आता माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर अपक्ष म्हणून  रिंगणात असल्याने आमदार सोपटे, मगोपचे जीत आरोलकर, पार्सेकर, कळंगुटकर, आम आदमी पक्षाचे प्रसाद शहापूरकर, रिव्होल्युशनरी गोवन्सच्या सुनयना गावडे यांच्यात लढत अपेक्षित आहे.

इतिहास बदलणार की घडवणार?

मांद्रे मतदारसंघाचा इतिहास घडवण्यासाठी रिंगणात असणार असे माजी मुख्यमंत्री पार्सेकर सांगतात, तर आमदार सोपटे समर्थक इतिहास बदणार, असे सांगत आहेत. पार्सेकर यांनी केलेल्या बंडामुळे स्थानिक राजकारणही आता बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे पुढील काळात पार्सेकर कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याबरोबरच समर्थकांमध्ये उत्सुकतावाढली आहे. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Politicsराजकारण