शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Goa Election 2022 Nitin Gadkari : ... तर पेट्रोलची गरजच भासणार नाही, काँग्रेसकडून लोकांची दिशाभूल : नितीन गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 20:52 IST

गडकरी यांनी काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेसकडून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही केला.

पणजी : वर्षाकाठी महिलांना ३ गॅस सिलिंडर मोफत, ज्येष्ठ नागरिकांना दयानंद सुरक्षा योजनेखाली मिळणारे मानधन वाढवून ३ हजार रुपये करणार तसेच सहा महिन्यांत कायदेशीर मार्गाने खाणी सुरू करणार, अशी प्रमुख आश्‍वासने भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत. २२ कलमी संकल्पपत्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मंगळवारी पक्षाने जाहीर केले. यावेळी गडकरी यांनी काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेसकडून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही केला.

"काँग्रेस ८० रुपयांच्यावर पेट्रोल-डिझेल दर जाणार नाहीत, असे आश्वासन देत आहे. परंतु ते लोकांची दिशाभूल करत आहेत. कारण आता इलेक्ट्रिक तसेच इथेनॉलवर चालणारी वाहने येऊ घातली आहेत. त्यामुळे पेट्रोलची गरजच भासणार नाही. बसगाड्याही पर्यायी इंधनावर धावतील. इथेनॉल ६२ रुपयांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पेट्रोलची गरजच भासणार नाही. काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे," असे गडकरी म्हणाले.

मोदी सरकारने गोव्याला भरभरून दिले. राष्ट्रीय महामार्गांची पाच ते सहा हजार कोटींची कामे पूर्ण झालेली आहेत. पंचवीस हजार कोटी आधी मंजूर केले होते. त्यात आणखी पंधरा हजार कोटी मंजूर झाले असल्याचंही त्यांनी नमूद केले. 

भाजपकडून ८० टक्के कामे पूर्ण"२०१७ च्या निवडणुकीत भाजपने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांपैकी ८० टक्के कामे आम्ही पूर्ण केली. या नव्या जाहीरनाम्याचे रिपोर्ट कार्ड आम्ही देणार आहोत," असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. ‘अनेक राजकीय पक्ष गोव्यात आलेले आहेत आणि गोव्यात खाते उघडण्याच्या मोहापायी खोट्या आश्‍वासनांचा पाढा वाचत आहे. काही पक्ष टेकू घेऊन सरकार स्थापन करण्याची स्वप्ने पाहत आहेत. विरोधी कॉंग्रेस पक्षाने २००७ साली जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली होती, त्यातील किती पाळली हे दिगंबर कामत यांनी जाहीर करावे.  काँग्रेस सरकारच्या काळात किती घोटाळे झाले, याची यादी आमच्याकडे आहे,’ असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

‘स्वयंपूर्ण आणि समृद्ध गोव्यासाठी भाजपने कंबर कसली आहे, युवक महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच समाजाच्या प्रत्येक घटकाला जाहीरनाम्यात स्थान दिलेले आहे. गरिबांना घर बांधण्यासाठी दोन टक्के अल्प व्याजाने कर्ज देणार आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

जाहीरनाम्यातील ठळक आश्वासने

  • वर्षाकाठी तीन एलपीजी गॅस सिलिंडर मोफत.
  • गोवा खनिज विकास महामंडळामार्फत लोह खनिज ब्लॉकचा लिलांव 
  • सहा महिन्यात खाण व्यवसाय सुरू करणार
  • दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे मानधन दोन हजारवरुन वाढवून तीन हजार रुपये करणार.
  • घर बांधण्यासाठी गरिबांना दोन टक्के व्याजाने कर्ज तसेच भूखंड.
  • पेट्रोल, डिझेलवरील शुल्क वाढणार नाही.
  • पर्रीकर कल्याण निधी अंतर्गत पंचायतींना तीन कोटी रुपये तर पालिकांना पाच कोटी निधी.
  • पर्यटकांसाठी ‘होम स्टे’ व्यवस्था करणाऱ्यांना पाच लाखांचे बिनव्याजी कर्ज.
  • युवकांना नोकऱ्या देणाऱ्या उद्योजकांसाठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत पाच हजार रुपये भार सरकार उचलणार.
  • राज्य पूर्ण पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी अंतर्गत भागातही पर्यटन सुविधा मजबूत करणार तसेच आध्यात्मिक व वैद्यकीय पर्यटनाला चालना देणार.
  • आंतरराष्ट्रीय बैठका, परिषदांसाठी गोवा आशियाई केंद्र बनविणार.
  • गोवा फुटबॉल डेस्टिनेशन बनविणार तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम व वीस वर्षे वयाखालील खेळाडूंसाठी फिफा विश्वचषक स्पर्धा गोव्यात आयोजित करणार.
  • गोव्याची अर्थव्यवस्था पुढील दहा वर्षात पन्नास अब्ज डॉलरची करणार.
  • ‘काम करा, समृद्ध व्हा’, या संकल्पनेअंतर्गत गोव्यात गंतव्यस्थान बनविणार.
  • राज्यात तंत्रज्ञान संशोधन केंद्र उभारणार.
  • ॲप्रेंटिसना प्रशिक्षणादरम्यान पाच हजार रुपये स्टायपेंड देणार.
टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Nitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPramod Sawantप्रमोद सावंत