शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022: खोट्या आश्वासनांनी सरकारचे अपयश लपवू नका; अमित पालेकरांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:29 IST

Goa Election 2022: भाजप सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांना गोवेकर बळी पडणार नाही याची खात्री आहे, असे आपने म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची खोटी आश्वासने प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे अपयश लपवू शकत नाहीत,’ अशी टीका करीत आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अमित पालेकर यांनी खाण अवलंबितांना खोटी आश्वासने दिल्याबद्दल भाजप सरकारवर हल्ला चढविला आहे.

नुकत्याच झालेल्या गोव्याच्या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, यांनी गोव्यातील खनिजाचे  विधानसभा निवडणुकीनंतर पारदर्शक लिलाव प्रक्रियेसह पुन्हा कार्यान्वित केला जाईल असे जाहीर केले होते. या आश्वासनाला आम आदमी पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना अमित पालेकर म्हणाले, ‘भाजपने राज्यात दहा वर्षे राज्य केले आहे. मग राज्यातील खाणकाम सुरू करण्यापासून भाजप सरकारला कोणी रोखले होते? भाजप सरकार अकार्यक्षम असून, नि:स्वार्थी हेतूने कोणतेही काम करीत नाही, अशी टीका पालेकर यांनी केली. ‘खोटी आश्वासने देऊन गोवेकरांना मूर्ख बनविणे बंद करा. सत्तेवर असताना त्यांनी काही केले नाही. आता आपले अपयश लपवण्यासाठी भाजपकडून आश्वासने दिली जात आहेत,’ असे ते म्हणाले. 

‘काम केले असेल, तर लोकांनी मतदान करावे, असे सांगण्याचे धाडस दिल्लीतील आप सरकारने दाखविले होते; पण भाजपमध्ये ही हिंमत नाही. कारण त्यांनी कोणतेही काम केले नाही. त्यामुळे खोटे पसरविण्यासाठी इतर राज्यांतून वरिष्ठ  नेत्यांना गोव्यात बोलावावे लागले असल्याची टीका त्यांनी केली. 

‘भाजप सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांना गोवेकर बळी पडणार नाही याची खात्री आहे. पक्षाने काही काम केले असेल तरच मतदान करा असे सांगण्याचे धाडस केवळ ‘आप’ करते’ असे ते म्हणाले. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Aam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपा