शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Goa: दारूच्या नशेत राडा: चौघा तरुणांनी २१ वर्षीय तरुणाची केली मारहाण

By पंकज शेट्ये | Updated: May 29, 2024 20:48 IST

Goa Crime News: बारमध्ये बसून मद्यसेवन करताना चार तरुणांच्या गटाचे अन्य एका तरुणाशी किरकोळ विषयावरून वाद घातल्यानंतर त्याचे परीवर्तन मारामारीत झाले. बिर्ला - झुआरीनगर येथील बारमध्ये मंगळवारी रात्री ११.३० वाजता चार तरुणांनी मंजूनाथ नौले नामक २१ वर्षीय तरुणावर चाकू आणि काचेच्या ग्लासने हल्ला करून मारहाण केल्याने तो जखमी झाला.

- पंकज शेट्ये  वास्को -  बारमध्ये बसून मद्यसेवन करताना चार तरुणांच्या गटाचे अन्य एका तरुणाशी किरकोळ विषयावरून वाद घातल्यानंतर त्याचे परीवर्तन मारामारीत झाले. बिर्ला - झुआरीनगर येथील बारमध्ये मंगळवारी रात्री ११.३० वाजता चार तरुणांनी मंजूनाथ नौले नामक २१ वर्षीय तरुणावर चाकू आणि काचेच्या ग्लासने हल्ला करून मारहाण केल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहे. त्याप्रकरणात वेर्णा पोलीसांनी त्वरित कारवाई करून रात्रीच चार जणाच्या गटातील रंगप्पा कमल याला अटक केली. पोलीसांनी अटक केलेला रंगप्पा साकवाळ पंचायतीचा माजी पंच सदस्य असून बुधवारी (दि.२९) त्याला न्यायालयात उपस्थित केले असता त्यास दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश न्यायाधीक्षाने बजाविला.

वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री ११.३० वाजता मारहाणीचा ती घटना घडला. बिर्ला - झुआरीनगर येथे असलेल्या ‘प्रिती बार ॲण्ड रेस्ट्रोरंण्ट’ मध्ये चार तरुणांचा एक गट मद्यसेवनासाठी बसला होता. तसेच तेथे असलेल्या दुसऱ्या टेबलवर बिर्ला - झुआरीनगर येथे राहणारा मंजूनाथ नौले नामक तरुण बसला होता. ‘तु कोणाला पाहतोस’ अशा किरकोळ विषयावरून चार तरुणाचा आणि मंजूनाथचा वाद निर्माण झाल्यानंतर त्याचे परिर्वतन मारामारीत झाले. त्या चार तरुणांनी मंजूनाथची मारहाण करण्यास सुरू करून त्याच्या डोक्यावर काचेच्या ग्लासने हल्ला करण्याबरोबरच पाठीवर सुऱ्याने हल्ला केल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली. मंजूनाथची मारहाण केल्यानंतर चारही तरुणांनी घटनास्थळावरून पोबारा काढल्याची माहीती पोलीसांनी दिली. मारहाणीत जखमी झालेल्या मंजूनाथला नंतर त्वरित बांबोळी येथील गोमॅकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी झालेला मंजूनाथ कबड्डी खेळाडू असल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली.

वेर्णा पोलीसांना मंजूनाथ नौलेच्या मारहाणीची माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन चौकशीला सुरवात केली. मंजूनाथच्या मारहाण प्रकरणात साकवाळचे माजी पंच रंगप्पा कमल यांच्यासहीत शिवानंद हीरेगौडार, युवराज चिंबल आणि दिपक हिरेमठी असल्याची माहीती पोलीसांना मिळाली. पोलीसांनी त्वरित कारवाई करून रंगप्पा याला ताब्यात घेऊन अटक केली. त्या मारहाण प्रकरणातील इतर तीन संशयित आरोपी सापडलेले नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बुधवारी वेर्णा पोलीसांनी रंगप्पा याला न्यायालयात उपस्थित केला असता त्याला दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश न्यायाधिक्षाने बजाविला. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा