शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

गोमंतकीय क्रिकेटपटूंना मोठे भवितव्य; रोहन गावस-देसाई यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 13:06 IST

बीसीसीआय संयुक्त सचिवपदाचा स्थानिकांना फायदा होईल

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या (बीसीसीआय) संयुक्त सचिवपदाच्या माध्यमातून राज्यातील क्रिकेटचा अधिक विकास व्हावा, हेच ध्येय मी उराशी बाळगले आहे. गोवा क्रिकेट संघटना (जीसीए) आणि बीसीसीआय यांच्यात समन्वय साधणे शक्य असल्याने अनेक गोष्टी सोप्या होतील. माझ्या या पदाचा गोमंतकीय खेळाडूंना कसा फायदा होईल, याची काळजी घेतली जाईल. गोमंतकीय क्रिकेटपटूंमधील कौशल्य पाहता त्यांना मोठे भवितव्य आहे, असे मत बीसीसीआयचे नूतन संयुक्त सचिव रोहन गावस-देसाई यांनी व्यक्त केले. गावस-देसाई यांनी गुरुवारी 'लोकमत' को कार्यालयाला भेट दिली आणि संवाद साधला. यावेळी त्यांनी क्रिकेट जगतातील विविध पैलूंवर चर्चा केली.

रोहन गावस-देसाई म्हणाले की, 'मी स्वतः क्रिकेटपटू म्हणून राज्यातील सर्व स्पर्धा खेळलो. २००४-०५ या वर्षापासून मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अनेकदा राज्याचे प्रतिनिधित्व केले. या काळात मला जाणवले की, क्रीडा क्षेत्राशी कनेक्ट असण्यासह प्रशासक म्हणून क्रिकेटसाठी खूप काही करु शकतो. म्हणूनच मी जीएसएमवर येण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला यश मिळाले नव्हते. मात्र २०२२ साली मी जीसीएच्या सचिवपदी बिनविरोध निवडून आलो. त्यानंतर गोमंतकीय क्रिकेटसाठी जे करणे शक्य होते ते सर्व केले. याची पोहोचपावती म्हणून बीसीसीआयच्या संयुक्त सचिवपदाची जबाबदारी मिळाली.

गावस-देसाई म्हणाले की, 'साऊथ झोन निवड समितीच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. या संधीचे सोने करत सुयश प्रभूदेसाई, दर्शन मिसाळ यांना यात जागा मिळवून दिली. आमच्या सहाय्य कर्मचारी, फिजीओथेरपीस्टना संघासोबत राहण्याची संधी मिळाली. आम्ही निवडलेल्या संघाने देवधर चषक व दुलीप चषकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.

महिला क्रिकेटपटूंना डब्लूपीएलचे चांगले व्यासपीठ

पुरुष संघाने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. सध्याच्या स्थितीत सुयश प्रभूदेसाई, मोहित रेडकर, मंथन खुटकर, कश्यप बखले यांसारख्या युवा खेळाडूंचे भविष्य उज्वल दिसत आहे. यातील काहीजण निश्चितच भारतासाठी खेळताना दिसतील. पण महिला क्रिकेटसाठी अजून खूप विकासाची आवश्यकता आहे असे गावस-देसाई म्हणाले.

त्यांनी सांगितले की, 'जीसीएने नेहमीच महिला क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून दिले आहे. गोवा महिला प्रिमीयर लीग स्पर्धा घडवून आणणारी गोवा पहिले राज्य आहे.

आता महिला प्रिमियर लीग बीसीसीआयने सुरू केली. त्यातून भारतीय महिला संघाच्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर करणे, खेळण्यासाठी एक चांगले व्यासपीठ तयार झाले आहे. गोमंतकीय महिला खेळाडू काही वर्षांमध्ये येथे दिसू शकतात.

निवासी अकादमी सुरु करणार

रोहन गावस-देसाई म्हणाले, 'भविष्याचा विचार करता कोरोना काळात बंद असलेली शालेय स्तरावरील क्रिकेट स्पर्धा आम्ही पुन्हा नव्याने सुरू केली. विभागीय स्पर्धाही खेळवल्या. दिनेश मोंगीया, जे. पी यादव सारखे राष्ट्रीय टीमचे प्रतिनिधीत्व करणारे प्रशिक्षण आम्ही आणले. 

स्थानिक गुणवत्ता असलेले क्रिकेटपटू सगुण कामत, स्वप्नील अस्नोडकर, निनाद पावस्कर, राहुल केणी, रॉबीन डिसोझा यांची १३, १७, १९, २३ अशा विविध वर्षाखालील संघाचे प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. आता यापुढे निवासी अकादमी सुरु करण्याचा प्रयत्न आहे.

पर्वरी येथे आणि सांगेतही आम्हाला निवासी अकादमी सुरू करायची आहे. याबाबतच्या निविदादेखील काढण्यात आल्या आहेत. काही तांत्रिक गोष्टी आहेत. पण आगामी काळात क्रिकेटसाठी निवासी अकादमी सुरू होईलच.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम गरजेचे

राज्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम ही काळाची गरज आहे. प्रत्येक राज्यात जवळपास एक चांगले स्टेडियम आहे. आपले पर्यटन राज्य असूनदेखील आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टेडियम नाही. स्टेडियमचा विषय हा क्लबकडेच प्रलंबित आहे असे गावस-देसाई म्हणाले. त्यांनी सांगितले की, 'क्लबना हवे तर पुढील काही दिवसांतच स्टेडियमचे ठिकाण निश्चित करून तेथे तयारी सुरू केली जाऊ शकते.

क्लबचे एकमत खूप आवश्यक आहे. त्यांचे एकमत झाले तरच आम्ही पुढे जाऊ शकतो. माझे वैयक्तिक मत म्हटले तर वन मावळिंगे हीच जागा स्टेडियमसाठी योग्य आहे. धारगळ येथील जमीन सरकारची असून ती भाडे तत्वावर आमच्याकडे आहे. वन मावळींगेची जमीन जीसीएची आहे. २०१६ मध्ये ती ४० कोटी खर्चुन खरेदी करण्यात आली.

धारगळचा विचार केला तर येथे परवानगीसाठी अनेक समस्या आहेत. जमीन भाडेतत्त्वावर असल्याने स्टेडियमही कायमस्वरुपी जीसीएकडे राहणार नाही, तर थेट सरकारकडे जाईल.

वन मावळींगे येथील जमीन सपाट आहे. डिचोलीत चांगले २०० खोलीचे हॉटेलही झाले आहे. कनेक्टिव्हीटी पाहिल्यास मोपा विमानतळ डिचोलीपासून जास्त लांब नाही. स्टेडियमच्या माध्यमातून डिचोलीचा बऱ्यापैकी विकास होईल.

पक्षाला जे हवे तेच करू

राजकारणातील प्रवेशाबाबतच्या चर्चेबद्दल विचारले असता रोहन गावस देसाई यांनी सांगितले की, 'मी कुडचडेतील सामाजिक कार्यामध्ये गेली आठ वर्षे आहे. माझे कुटूंब सामाजिक कार्यामध्ये आहे. मी कधीच निवडणुकीचा, तिकिटचा विचार केला नाही. किंवा जाहीरपणे तिकीट मागितलेले नाही. मी केवळ पक्षाचा कार्यकर्ता म्हणून वावरलो आहे. विद्यमान आमदारांना निवडून आणण्यासाठी २०१७आणि २०२२ साली वावरलो आहे. पक्षाला हवे असलेले काम मी केले आणि यापुढेही जे पक्षाला हवे तेच देण्याचा माझा प्रयत्न असेल.

या गोष्टींमध्ये प्रामुख्याने बदल...

जीसीए सचिवपदी नियुक्तीनंतर मी सर्वात आधी मैदाने आणि खेळाडूंसाठीच्या सुविधा सुधारण्यावर भर दिला असे गावस-देसाई यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'पर्वरी येथील क्रिकेट अकादमी मैदानावरील खेळपट्टीमध्ये बदल केला. एकूण आठ खेळपट्ट्या मी तयार केल्या. यात चार तांबड्या मातीच्या तर चार काळ्या मातीच्या आहेत. चिखली मैदान, मडगाव क्रिकेट संघटनेचे मैदान, पणजी जिमखाना मैदानांसोबत करार करत त्यांना आमच्या अंतर्गत आणले. धोरणांमध्ये बदल घडवले. सहाय्यक कर्मचारी वाढवले. एवढेच नाही तर जीसीएशी संलग्न १०७ क्लब्सच्या वार्षिक मानधनात वाढ केली. पूर्वी त्यांना वर्षाला एक लाख रुपये मिळायचे, ते आता वाढवून दोन लाख रुपये केले आहेत.

अनेक उपाययोजना

गेल्या दोन ते तीन वर्षांच्या काळात आम्ही अनेक उपाययोजना केल्या आहेत. क्रिकेटपटूंना सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्याचे चांगले परिणामही दिसून येत आहेत. १६ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आम्ही देवधर चषक जिंकलो. अनेक उपाययोजनादेखील केल्या. आता बीसीसीआयमध्ये असलो तरी जीसीएमध्येही लक्ष असेल. त्यामुळे ज्या सुविधा, प्रकल्पांची सुरुवात केली ते सुरुच राहतील. त्यातून खेळाडूंच्या संख्येत आणि गुणवत्तेत वाढ होईल. राज्यातील खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करून भारतीय संघात आपला ठसा उमटावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे रोहन गावस-देसाई यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाBCCIबीसीसीआय