शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

मनोहर पर्रीकरांचे खरे शिष्य; लोकसभा निवडणुकीत प्रमोद सावंतांचे काम प्रभावी अन् व्यापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2024 11:12 IST

पूर्वी निवडणुकांवेळी मनोहर पर्रीकर ज्या पद्धतीने काम करायचे, त्याच पद्धतीचे प्रभावी व व्यापक काम यावेळी डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

- सद्‌गुरू पाटील निवासी संपादक, गोवा

सासष्टीत काँग्रेसला साठ हजारांपेक्षा अधिक आघाडी मिळाली नाही तर काँग्रेस जिंकूच शकणार नाही. साठ हजार मतांची लिड मिळाली तरी काँग्रेस जिंकू शकत नाही; कारण ती लिड फोंडा, सांगे, सावर्डे या भागात व मुरगाव तालुक्यात तसेच काणकोण व केपे तालुक्यात भाजप सहज भरून काढील.

पूर्वी निवडणुकांवेळी मनोहर पर्रीकर ज्या पद्धतीने काम करायचे, त्याच पद्धतीचे प्रभावी व व्यापक काम यावेळी डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. मुख्यमंत्री सावंत हे पूर्ण पू गोव्यात फिरले. ते केवळ आपल्या साखळी मतदारसंघापुरते किंवा केवळ डिचोली तालुक्यापुरते मर्यादित राहिले नाहीत. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये सावंत यांनी दौरे केले. कार्यकर्त्यांची शेकडो संमेलने, हजारो बैठका व काही जाहीर सभा घेतल्या. खिस्ती मतदारांमध्येही सावंत यांनी यावेळी जोरात प्रचार केला, दक्षिण गोव्यात भाजप जर जिंकला तर त्याचे अधिकांश श्रेय डॉ. सावंत यांनाच जाईल. 

अर्थात भाजपला यावेळी दक्षिण गोव्यात जास्त मते मिळालेली असतील असे म्हणण्यास खूप वाव आहे. हिंदू मतदारांची संख्या जास्त असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये जास्त प्रमाणात मतदान झाले, त्यामागे भाजपचेच प्रयत्न आहेत हे मान्य करावे लागेल, काँग्रेसने लोकांना मतदानासाठी बाहेर काढले नाही, बाहेर येऊन आपल्यासाठी मतदान करा असे सांगण्यासाठी फिल्डवर अत्यंत सक्रीय कार्यकर्ते व कार्यकर्त्यांच्या टीम्स लागतात, काँग्रेसकडे ही व्यवस्थाच नव्हती व आताही नाही. त्यामुळे भाजपला अधिक मोकळे रान मिळाले. मुख्यमंत्री सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी या संधीचे सोने केले. 

पर्रीकर विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांवेळी कसे काम करायचे ते आम्ही काही पत्रकारांनी खूप जवळून पाहिले होते, अनुभवले होते. त्याच पद्धतीने मुख्यमंत्री सावंत यांनी आता काम केले आणि त्यांना तानावडे, उपाध्यक्ष दत्ता खोलकर तसेच नरेंद्र सावईकर, दामू नाईक, विनय तेंडुलकर आदी अनेक पदाधिकाऱ्यांची योग्य साथ मिळाली, विरोधातील इंडिया आघाडीही संघटीत होती, पण कार्यकर्ते कमी, संघटनात्मक व्यवस्था नाही; यामुळे आघाडी कमी पडली. ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला प्रचंड आघाडी एरव्ही मिळते, त्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे काम नावापुरतेही नाही. जिथे भाजपला वीस हजार मते मिळतात तिथे काँग्रेसला चार-पाच हजार एवढीच मते मिळतात. ती देखील भाजप नको म्हणून काँग्रेसला मत दिले असे सांगणान्या लोकांची.

भाजपकडे अठरा हजार कार्यकर्ते आहेत, पन्ना प्रमुख ही व्यवस्था भाजपने अत्यंत प्रभावीपणे यावेळी राबवली. परवा मला तानावडे यांनी सांगितले की- भाजपच्या ज्या आमदाराने पन्ना प्रमुख ही भाजपची व्यवस्था स्वीकारली, त्या आमदाराच्या मतदारसंघात ८० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. पणजीत बाबूश भोन्सेरात यांनी पन्ना प्रमुख पद्धत चांगल्या प्रकारे अमलात आणलीच नाही, त्यामुळे पणजीत मतदान मर्यादित प्रमाणात झाले. मडगाव, कुडचडेतही त्या त्या आमदारांनी पन्नाप्रमुख पद्धत छान राबवली. डिचोलीत राबवली गेली, साखळीत तर उत्तम प्रकारे अंमलबजावणी झाली. त्या सगळीकडे मतदान खूप वाढलेय, सत्तरी तालुक्यात विश्वजित राणे यांनी स्वतःची वेगळी व आक्रमक व्यवस्था राबवली आणि मतदान वाढवून दाखवले.

प्रमोद सावंत भाजपसाठी अगदी झोकून देऊन काम करतात, खूप कष्ट घेतात. सरकार सांभाळताना खूप कसरती कराव्या लागतात. काही मंत्री छळत असतात, ठरावीक फाइल्स संमत व्हाव्यात एवढीच काही मंत्री व आमदारांची अपेक्षा असते. अर्थात अशा प्रकारचा त्रास सावंत यांच्या वाट्याला तुलनेने आता कमी येतो. कारण सरकार भक्कम आहे. हे आघाडी सरकार नव्हे, मगो पक्षही मुख्यमंत्र्यांवर दबाव घालू शकत नाही. तरी देखील सरकार चालवतानाच राज्यभर फिरून पक्षाचे काम करत राहणे हे कष्टाचे असते, पर्रीकर यांचे आरोग्य ढासळण्यास तेही एक कारण होते. पर्रीकर यांना कायम काही मंत्र्यांच्या कटकटींना तोंड द्यावे लागायचे, पक्ष काम करतच गोवाभर फिरावे लागत असे, जेवण वगैरे वेळेवर होतच नव्हते. मुख्यमंत्री सावंत हे वेळेचे व्यवस्थापन नीट करतात.

भाजपकडे प्रशिक्षण व्यवस्था आहे. त्या प्रशिक्षणातून कार्यकर्ते तयार होतात. कार्यकर्ते चुकांतून शिकतात. मुख्यमंत्र्यांनी भाजप संघटनेत पूर्वी विविध टप्प्यांवर काम केल्यामुळे त्यांनाही अनुभव मिळाला. पर्रीकर यांच्यामुळेच आपण राजकारणात पुढे येऊ शकलो, पर्रीकरांनी तिकीट दिले, वाव दिला; त्यामुळे आपण आमदार होऊ शकलो असे प्रमोद सावंत अनेकदा सांगतात. सावंत यांची कसोटी गेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही लागली होती. २०२२ ची विधानसभा निवडणूक सावंत व तानावडे यांनी हाताळली, पण त्यावेळी मदतीसाठी देवेंद्र फडणवीस महिनाभर गोव्यात होते. सी. टी. रवी हेही गोव्यात वारंवार यायचे. रोहन खंवटेंसह काहीजणांना पक्षात आणण्याचे काम त्यावेळी फडणवीस व इतरांनी केले होते. 

यावेळी लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री सावंत व प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी स्वबळावर सगळी योजना राबवली. पूर्ण गोव्यात जोरात काम केल्याने मतदानाची टक्केवारी वाढलीच शिवाय दोन्ही जागा भाजप जिंकतोय असा आत्मविश्वास पक्षाच्या रैंक अॅण्ड फाईलमध्ये निर्माण झाला. श्रीपाद नाईक यांच्याबाबत उत्तरेत नाराजी होती, पण त्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी यशस्वी मात केली आहे. दक्षिण गोव्यातील खिस्ती मतदार आणि काही ख्रिस्ती धर्मगुरूंनी काँग्रेसला यावेळी जबरदस्त साथ दिली. पण सावर्डे, सांगे, कुडचडे, केपे, फोंडा तालुका व मुरगाव तालुक्यातील मतदानाच्या बळावर भाजप जिंकेल असेच दिसते. पल्लवी धेंपे यांच्यासाठी ती लॉटरी असेल व त्याचे श्रेय मुख्यमंत्री सावंत आणि भाजपच्या सर्व मंत्री, आमदारांना जाईल हे वेगळे सांगायला नको. 

गोव्यात काँग्रेस संघटनात्मक पातळीवर खूप विस्कळीत झाली आहे, काही ठिकाणी ती खिळखिळीच झाली आहे. आमदार पक्ष सोडून गेले की काँग्रेसचे कार्यकर्तेही आमदारासोबत दुसऱ्या पक्षात जातात. तिथे हा पक्ष मार खातो. यावेळी कळंगुट, सांताक्रूड़ा व हळदोणे या तीनच विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसला लिड मिळू शकते, अशी चर्चा भाजपच्या आतिल गोटात आहे. 

कळंगुटमध्ये काँग्रेससाठी जोझफ सिक्वेरा यांनी काम केले, दक्षिण गोव्यात भाजपला बाणावली, नुवे, वेळ्ळी अशा काही मतदारसंघांमध्ये कधी आघाडी मिळतच नाही. तिथे पाच हजार मते मिळणे हेच मोठे काम असते, सासष्टीत काँग्रेसला साठ हजारांपेक्षा अधिक आघाडी मिळाली तरी काँग्रेस जिंकूच शकणार नाही. साठ हजार मतांची लिड मिळाली तरी काँग्रेस जिंकू शकत नाही, कारण ती लिड फोंडा, सांगे, सावर्डे व मुरगाव तालुक्यात तसेच काणकोण व कैपे तालुक्यात भाजप सहज भरून काढील. फोंडा तालुक्यात भाजपला वीस हजार लिड मिळू शकते. उर्वरित तालुक्यांमध्ये आणखी चाळीस हजार मतांची आघाडी भाजप प्राप्त करूच शकतो. मुख्यमंत्री सावंत यांचे नेतृत्व याबाबतीत नशीबवान ठरले आहे, असे आताच पक्षाचे काही महत्त्वाचे पदाधिकारी बोलत आहेत.

पर्रीकर यांच्या निधनानंतरच्या काळापासून ते आतापर्यंत मुख्यमंत्री सावंत खऱ्या अर्थाने भाजपची धुरा गोव्यात यशस्वीपणे सांभाळत आहेत. पंतप्रधान मोदी किवा गृहमंत्री शहा यांनाही याची कल्पना आली आहे. एकदा लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकल्या की, सावंत यांचे आसन गोव्यात अधिक भक्कम होईल असे म्हणण्यास खूप वाव आहे. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा