शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेत जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 10:59 IST

मुंबईमधील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बुधवारी (29 ऑगस्ट) संध्याकाळी पुढील उपचारांसाठी अमेरिकेत जाणार आहेत.

पणजी -  मुंबईमधील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बुधवारी (29 ऑगस्ट) संध्याकाळी पुढील उपचारांसाठी अमेरिकेत जाणार आहेत. आज सायंकाळी ते अमेरिकेस रवाना होतील याची कल्पना मंत्र्यांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्री पर्रीकर 22 जुलैला सायंकाळी अमेरिकेहून अकरा दिवसांचे उपचार घेऊन गोव्यात परतले होते. न्यूयॉर्कमधील ‘स्लोन केटरिंग केन्सर ’ स्मृती रुग्णालयात ते उपचार घेत होते. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर आणि गोमेकॉचे डॉक्टर  कोलवाळकर हेही अमेरिकेला गेले होते.

मुख्यमंत्र्यांनी गोव्यात परतल्यानंतर विश्रांती घेणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी विश्रांती घेतली नाही.  दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश भाजपा नेत्यांकडून हाती घेतला व ते लोकांच्या गर्दीत सहभागी होऊन अर्धा किलोमीटर चालत गेले.  दुसऱ्या दिवशी त्यांना कोन्सटीपेशन झाले. तसेच उलटी होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्रीकर शनिवारी किंवा रविवारी गोव्यात परतणार होते. मात्र नंतर ते बुधवारी गोव्यात पोहोचतील असे मुख्यमंत्री कार्यालया तर्फे कळवण्यात आले होते. मात्र आज त्यात पुन्हा बदल झाला असून मुख्यमंत्री आज सायंकाळी अमेरिकेस जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी वारंवार समस्या निर्माण होत आहे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा