शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल; "विरोधासाठी विरोध करणाऱ्या शक्ती वावरत आहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 12:48 IST

वीज वाहिन्यांचेही काम जर करता आले नाही तर लोकांच्या घरांमध्ये वातानुकूलित यंत्रणा तसेच उद्योग बंद पडतील.

पणजी : निवडणुका जवळ आलेल्या असल्याने प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याचे राजकारण राज्यात वाढत आहे. प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणे हे गोव्याच्या हिताचे नव्हे, काही शक्ती विरोधासाठी विरोध करण्याच्या हेतूनेच वावरत आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

वीज वाहिन्यांचेही काम जर करता आले नाही तर लोकांच्या घरांमध्ये वातानुकूलित यंत्रणा तसेच उद्योग बंद पडतील. घरात तीन-चार वातानुकूलित यंत्रणा लावून अनेकजण झोपतात पण वीज वाहिन्यांचा प्रकल्प झाला नाही तर यंत्रणा चालू शकणार नाहीत. काहीजण लंडनमध्ये राहतात व मोलेच्या प्रकल्पाला विरोध करतात. मोले कुठे व लंडन कुठे याचा तरी विचार व्हायला हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रत्येक प्रकल्पाला अर्थहीन पद्धतीने विरोध करण्यासाठीच काही शक्ती वावरत आहेत. पुढील वीस वर्षानंतर कधी तरी राष्ट्रीय महामार्गाचे काम होईल पण त्याचे नियोजन आतापासूनच करावे लागते. आम्ही ते नियोजन सुरू केले तरी विरोध केला जातो. बेतुल बंदराच्या विषयावरूनही काहीजण अपप्रचार करू पाहतात. ते बंदर आम्ही यापूर्वीच रद्द करून घेतले आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. आमचे सरकार सामान्य माणसाचा व समाजात सर्वात शेवटपर्यंत असलेल्या घटकाच्या विकासासाठी वावरत आहे.

गोवा सरकारने हे राज्य स्वयंपूर्ण करण्यावर भर दिला आहे. अधिकाऱ्यांना त्यासाठी तयार केले गेले आहे. वरिष्ठ अधिकरी पंचायतींना भेट देतील. गोवा मुक्त होऊन साठ वर्षे झाली पण अजूनही काही मूलभूत समस्या येथे कायम आहेत. त्या सोडविल्या जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. आयआयटीसारख्या चांगल्या प्रकल्पालाही काहीजण विरोध करतात. हे ठीक नव्हे. अशा प्रकारचे प्रकल्प यायलाच हवेत. लोकांनी चर्चेसाठी यावे, आपण स्वत: लोकांचे सगळे म्हणणे ऐकून घेतो. आम्ही प्रश्न सोडवतो असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत