शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे सचिवालयात येणे पुन्हा मंदावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 12:42 IST

नववर्षाच्या पहिल्या दिवशीच मोठ्या धमुधडाक्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सचिवालयात आले व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पर्रीकर यांच्या या भेटीचे रुपांतर मोठ्या सोहळ्यात करून टाकले तरी, लगेच त्यांचे सचिवालयात येणे पुन्हा बंद झाले आहे.

ठळक मुद्दे1 व 2 रोजी म्हणजे मंगळवार व बुधवारी सचिवालयात आल्यानंतर पर्रीकर मग मात्र पुन्हा आले नाहीत.राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून परिमल रे यांनी ताबा घेतला असून रे यांनी प्रशासनाची सुत्रे हाती घेऊन अधिकाऱ्यांना व विविध खात्यांना सक्रिय करणे सुरू केले आहे. पर्रीकर यांनी नव्या वर्षी सचिवालयात पाऊल ठेवून मंत्री व आमदारांच्या अनौपचारिक बैठकाही घेतल्या.

पणजी : नववर्षाच्या पहिल्या दिवशीच मोठ्या धमुधडाक्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सचिवालयात आले व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पर्रीकर यांच्या या भेटीचे रुपांतर मोठ्या सोहळ्यात करून टाकले तरी, लगेच त्यांचे सचिवालयात येणे पुन्हा बंद झाले आहे. अर्थात पर्रीकर पुन्हा सचिवालय तथा मंत्रलयात येणे सुरू करतील पण 1 व 2 रोजी म्हणजे मंगळवार व बुधवारी सचिवालयात आल्यानंतर पर्रीकर मग मात्र पुन्हा आले नाहीत.

पर्रीकर यांना पॅनक्रिएटीक कॅन्सर असल्याने केमोथेरपी घ्यावी लागते. त्यांनी गेल्या गुरुवारी केमोथेरपी घेतली होती, असे एका मंत्र्याने सांगितले. पर्रीकर हे 2018 साली चार महिने सचिवालय तथा मंत्रालयात येऊ शकले नव्हते व त्यामुळे प्रशासनावर मोठा परिणाम झाला होता. पर्रीकर यांनी आपल्या खासगी निवासस्थानीच दोनवेळा मंत्रिमंडळाच्या बैठका घेतल्या होत्या. पर्रीकर यांची प्रकृती थोडी सुधारल्याने त्यांना पुन्हा केमोथेरपी देणो सुरू केले गेले. ते योग्य स्थितीत आहेत व पुन्हा मंत्रालयात येऊ लागतील, असे सुत्रांनी सांगितले. राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून परिमल रे यांनी ताबा घेतला असून रे यांनी प्रशासनाची सुत्रे हाती घेऊन अधिकाऱ्यांना व विविध खात्यांना सक्रिय करणे सुरू केले आहे. 

पर्रीकर यांनी नव्या वर्षी सचिवालयात पाऊल ठेवून मंत्री व आमदारांच्या अनौपचारिक बैठकाही घेतल्या. त्यांनी काही फाईल्सही निकालात काढल्या. 2 जानेवारी रोजी ते दोन ते अडीच तास सचिवालयात होते. दुपारी जेवायला गेल्यानंतर मग सायंकाळच्या सत्रात मात्र ते गेल्या आठवड्यात कधीच सचिवालयात आले नाहीत. येत्या 29 पासून विधानसभा अधिवेशनास आरंभ होत आहे. तत्पूर्वी विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीला पर्रीकर येतील, असे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाBJPभाजपा