शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पाचा षटकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 12:20 IST

याचेच प्रतिबिंब दरवेळी त्यांच्या अर्थसंकल्पात दिसते.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कौतुक करायला हवे. त्यांना ओळीने सलग सातव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्याची संधी मिळाली. सलग सात वर्षे मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला. प्रमोद सावंत यांना आणखी एका गोष्टीसाठी दाद द्यावी लागेल, ती गोष्ट म्हणजे त्यांना सामान्य माणसाला, मध्यमवर्गीयांना नेमके काय हवे आहे, हे कळते. ते स्वतः ग्रामीण भागातून, सामान्य कुटुंबातून पुढे आले असल्याने त्यांना गरजू समाजाच्या अपेक्षा लवकर कळतात. विद्यार्थी व पालकांच्या गरजा त्यांच्या लक्षात येतात. याचेच प्रतिबिंब दरवेळी त्यांच्या अर्थसंकल्पात दिसते.

अर्थसंकल्पातून करण्यात आलेल्या घोषणांची व्यवस्थित अंमलबजावणी मात्र व्हायला हवी. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच गोवा विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे लोकप्रिय घोषणा अपेक्षितच होत्या. गोवा प्रशासनात गेली दहा वर्षे कंत्राटी पद्धतीवर अनेक कर्मचारी काम करतात. काहीजण दहापेक्षाही अधिक वर्षे काम करत आहेत. त्यांना खरे म्हणजे यापूर्वीच सेवेत कायम करायला हवे होते. पूर्वीच्या काही मुख्यमंत्र्यांनीही अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री सावंत यांनी काल केलेल्या घोषणेनुसार सर्व कंत्राटी कर्मचारी जर यापुढे सेवेत कायम झाले, तर ते स्वागतार्हच ठरेल. 

२०२६-२७सालासाठीचा गोव्याचा अर्थसंकल्प विविध नव्या योजनांचा समावेश असलेला आकर्षक दस्तऐवज आहे. एकूण ३० हजार १९५ कोटी रुपये खर्चाची तरतूद बजेटमध्ये आहे. सरकारी नोकरभरतीची सगळी सूत्रे गोवा कर्मचारी भरती आयोगाकडे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सोपवलेली आहेत. गुणवत्तेच्या आधारे युवा-युवतींची निवड होत आहे. अशा प्रकारचा कर्मचारी भरती आयोग आणणारे प्रमोद सावंत गोव्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांना शाबासकी द्यावीच लागेल. आपल्याला नोकरी कधी मिळेल याकडे काणकोणपासून पेडण्यापर्यंतचे बेरोजगार युवक लक्ष ठेवून आहेत. मंत्री, आमदारांच्या वशिल्याशिवाय नोकरी मिळविण्याचे दिवस आता आले आहेत, असे युवकांना वाटू लागले आहे. हा विश्वास कधी ढळणार नाही याची काळजी मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल. 

यावर्षी आणखी अडीच हजार सरकारी पदे भरली जातील. तसे मुख्यमंत्र्यांनीच काल बजेटमधून जाहीर केले. मेरिटच्या आधारेच जर शिक्षित व कौशल्यप्राप्त युवा-युवतींची प्रशासनात वर्ती लागली तर निश्चितच पुढील काही वर्षांत जास्त सक्रिय व कार्यक्षम प्रशासन मिळू शकेल. सरकारी खात्यांमध्ये पूर्वी वशिल्याने जी खोगिरभरती झाली, त्यातून कुणी मामलेदारपदापर्यंत पोहोचले, अनेकजण वरिष्ठ पदे बळकावून बसले. पण लोकांना न्याय देण्यात ते कमी पडले. अनेकांना नवे कायदे, सरकारी परिपत्रके, नियम, शासकीय अधिसूचना यात लिहिल्या गेलेल्या गोष्टीदेखील ठाऊक नाहीत. यामुळेच समस्यांवर तोडगा काढण्याचे ज्ञानदेखील कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे नाही, असा अनुभव काही खात्यांमध्ये येतो. यातून सामान्य माणसांच्या कामाचा केवळ फुटबॉल झाला. 

कर्मचारी भरती आयोगामुळे निदान ही स्थिती कालांतराने बदलून जाईल असे वाटते. अर्थात एक-दोन वर्षांतच बदल होणार नाही, काही वर्षे जावी लागतील. 'सरकार तुमच्या दारी' हा मुख्यमंत्र्यांचा आवडता कार्यक्रम आहे. सर्व तालुक्यांमध्ये त्यांनी यापूर्वी तो राबवून प्रशासन लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्र्यांनी विविध तालुक्यांमध्ये जाऊन, जनतेची गाऱ्हाणी ऐकून त्यावर उपाय काढायला हवा. हा एक चांगला उपक्रम आहे. फक्त जनतेचे प्रश्न खरोखर सुटतात काय हेही कधी तरी तपासून पाहावे लागेल. सध्या सगळीकडेच जनआंदोलने दिसून येत आहेत. सरकारी प्रकल्पांना लोक विरोध करतात. काल तर आंदोलनाचे लोण विधानसभा सभागृहातील प्रेक्षक गॅलरीपर्यंत पोहोचले. असो. तो एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. 

मुख्यमंत्र्यांनी पंचायत स्तरावरही सरकार तुमच्या दारी अभियान पोहोचविण्याचे ठरविले आहे. यावर्षी त्याची अंमलबजावणी होईल, असे काल जाहीर झाले. लोकांना जलदगतीने सरकारी सेवा मिळाल्या तर गोंयकार सरकारला आशीर्वादच देतील. गोव्याचे दरडोई उत्पन्न आता ८ लाख १८ हजार रुपये होईल, हा सरकारी अंदाज आहे. अर्थात श्रीमंत अधिक श्रीमंत होतात व गरीब अधिक गरीब होतोय, असा अनुभव लोकांना ग्रामीण भागात येतो, त्याकडेही सरकारने लक्ष द्यावे. बाकी अर्थसंकल्प चांगलाच आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Budget: A Sixer of Promises, Eyes on Elections

Web Summary : Chief Minister Pramod Sawant's budget focuses on job creation,contract employee regularization, and improved public services. Aiming for efficiency and addressing public grievances before upcoming elections, the budget reflects a people-centric approach with focus on youth employment and streamlined governance.
टॅग्स :goaगोवाBudgetअर्थसंकल्प २०२६Pramod Sawantप्रमोद सावंतBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन