शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Goa: बॅचलर पार्टीसाठी गोव्यात आलेल्या सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू, मृत तरुण जम्मू कश्मीरमधील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 17:07 IST

Goa: हरमल येथील 'स्वीट लेक'जवळ समुद्रात बुडून जम्मू कश्मीरच्या दोन पर्यटकांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. अमनदीप (२८) व अभिषेक (३४) अशी मृतांची नावे असून हे दोघे सख्खे भाऊ आहेत.

- चंद्रहास दाभोलकरहरमल - हरमल येथील 'स्वीट लेक'जवळ समुद्रात बुडून जम्मू कश्मीरच्या दोन पर्यटकांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. अमनदीप (२८) व अभिषेक (३४) अशी मृतांची नावे असून हे दोघे सख्खे भाऊ आहेत.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी हरमल येथील स्वीट लेकजवळील समुद्रात दोघेजण बुडाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तातडीने पोलिसांसह घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेहबाहेर काढले.  दोघेही जम्मू काश्मिर येथील आहे. त्यांच्यासोबत सुमित श्रीवास्तव (३३) व रुहान गुजरा (२८) हे दोघे मित्र होते. अभिषेक याचे लग्न ठरले होते. त्यामुळे बॅचलर पार्टीसाठी हे सर्वजण रविवारी गोव्यात आले होते.  

दरम्यान, आज सकाळी अभिषेक व अमन इतर दोन मित्रांसह हरमल येथील स्वीट लेक तळ्याजवळील समुद्रात आंघोळी आले होते. चौघेही पाण्यात उतरले होते. यातील अमनदीप व अभिषेक यांना अंदाज न आल्याने ते खोल समुद्रात गेले व तिथेच बुडाले. दोघेही बुडत असल्याचे मित्र रुहान व सुमित यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडा ओरड सुरू केली. परंतु, वेळीच मदत न मिळाल्याने ते बुडाले.

घटनास्थळी उपस्थिती काहींनी तातडीने पेडणे अग्निशमन दलाला संपर्क करून माहिती दिली. अग्निशमनचे जवान दाखल झाले व बचाव कार्य सुरू केले. दोन तासानंतर दोघाही भावांचे मृतदेह मिळाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे. पुढील तपास पेडणे पोलीस उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

टॅग्स :goaगोवाdrowningपाण्यात बुडणे