शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Goa: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांची विजयी सलामी

By समीर नाईक | Updated: November 4, 2023 19:07 IST

Goa News: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारपासून सुरू झालेल्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र पुरुष व महिला संघानी सलामीच्या सामन्यात शानदार सुरुवात करत यजमान गोवा संघावर मोठा विजय मिळवला.

- समीर नाईक पणजी - राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारपासून सुरू झालेल्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र पुरुष व महिला संघानी सलामीच्या सामन्यात शानदार सुरुवात करत यजमान गोवा संघावर मोठा विजय मिळवला. स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉ. गणेश गावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भारतीय खोखो महासंघाचे सरचिटणीस महेंद्रसिंग त्यागी आणि स्पर्धा संचालक डॉ. चंद्रजीत जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.

फोंडा येथील मल्टीपर्पज मैदानावर सुरू झालेल्या सलामीच्या खो-खो सामन्यात महाराष्ट्राच्या महिला संघाने यजमान गोवा संघावर ९०-१२ असा १ डाव ७८ गुणांनी दणदणीत धुव्वा उडवला. महाराष्ट्राकडून पायल पवार आणि प्रतीक्षा बिराजदार यांनी प्रत्येकी ३.३० मि. पळतीचा खेळ केला. संपदा मोरेने २.४० मि. संरक्षण करताना ४ गुण मिळवले तर प्रीती काळेने १.३० मि. संरक्षण करताना ४ गुण मिळवले. प्रियंका भोपीने २:२० मि. संरक्षण करताना २ गुण मिळवले, किरण शिंदेने आपली आक्रमणाची धार कायम राखत १२ गुण मिळवले तर पूजा फार्गाडे व प्रियांका इंगळेने प्रत्येकी १०-१० गुण संघासाठी वसूल केले. गोव्याकडून सावित्री गौडोने चांगली कामगिरी केली.

महिला संघांपाठोपाठ पुरुष गटात महाराष्ट्राने गोवा संघावर ५६-१६ असा १ डाव ४० गुणांनी दणदणीत विजय साकारला. महाराष्ट्राकडून खेळताना कर्णधार रामजी कश्यपणे २.२० मि. संरक्षण करून २ गुण मिळवले. ऋषिकेश मुर्चावडेने २ मि. संरक्षण करून ४ गुण मिळवले. सुयश गरगटेने १.४० मि. संरक्षण करून ४ गुण मिळवले तर आदित्य गणपुलेने २ मि. पळतीचा खेळ करत २ गुण मिळवले. ओमकार सोनवणे १.४० मि. संरक्षण करून ४ गुण मिळवण्यात यश मिळवले. लक्ष्मण गवसने २ मि. संरक्षण केले. गोव्याकडून अनिकेत वेळीपने आक्रमणात ४ गुण वसूल केले, तसेच प्रथमेश सपकाळने चांगली कामगीरी केली.

उद्घाटनीय पुरुषांच्या सामन्यात कर्नाटकने तेलंगणाचा ६०-२४ असा ३६ गुणांनी पराभव करीत चांगली विजयी सलामी दिली.महिलांच्या सामन्यात दिल्लीने हरियाणावर ५०-२८ असा ४.२५ मि. राखून २२ गुणांनी विजय मिळवला.

टॅग्स :goaगोवाMaharashtraमहाराष्ट्र