शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
3
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
4
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
5
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
6
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
8
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
9
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
10
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
11
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
12
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
13
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
14
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
15
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
16
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
17
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
18
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
19
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
20
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप

गोवा भाजपाला 20 डिसेंबरपर्यंत नवे प्रदेशाध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 14:28 IST

पक्ष पातळीवर पूर्वतयारी सुरू

पणजी : गोव्यातील भाजपसाठी नवे प्रदेशाध्यक्ष येत्या 20 डिसेंबर्पयत निवडले जाणार आहेत. त्याबाबतची पूर्वतयारी सध्या पक्ष पातळीवर सुरू आहे.सध्या विनय तेंडुलकर यांच्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्षपद आहे. तेंडुलकर हे राज्यसभेचेही सदस्य आहेत. तेंडुलकर यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यकाळ यापूर्वीच संपला आहे. फक्त पर्यायी व्यवस्था होईपर्यंत तेंडुलकर यांच्या हाती प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे ठेवली गेली आहेत. प्रदेशाध्यक्ष या नात्याने तेंडुलकर यांना गोव्यातील भाजपवर स्वत:चा काही खास ठसा उमटवता आला नाही. ते प्रदेशाध्यक्ष असतानाच गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी म्हणजे फेब्रुवारी 2017 साली गोवा भाजपचा मोठा पराभव झाला. भाजपचे केवळ तेरा उमेदवार त्यावेळी निवडून आले होते. मात्र अलीकडे काँग्रेसमधील दोन आमदार दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांना भाजपमध्ये आणण्यात तसेच मग काँग्रेसमधील दहा आमदार पुन्हा भाजपमध्ये आणण्यात तेंडुलकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. काँग्रेस पक्ष प्रथम फोडला गेला, तेव्हा भाजपचेच एक ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी तेंडुलकर यांना मोठ्या टीकेचे लक्ष्य बनविले होते. पण दिल्लीतील भाजप श्रेष्ठींनी तेंडुलकर यांची याबाबतीत पाठराखण केली. तेंडुलकर यांनी मगो पक्षाचे दोन आमदार फोडून भाजपमध्ये आणण्याचीही कामगिरी बजावली.आता भाजपचे भावी प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी आमदार दामू नाईक तसेच माजी मंत्री दिलीप परुळेकर यांची नावे चर्चेत आहेत. त्याचबरोबर गोविंद पर्वतकर आणि सदानंद शेट तानावडे या दोघा भाजप सरचिटणीसांची नावेही पक्षात भावी प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चेत आहेत. परुळेकर, दामू नाईक व पर्वतकर हे भंडारी समाजातील आहे. या समाजाची लोकसंख्या गोव्यात जास्त असल्याने याच समाजातील उमेदवार प्रदेशाध्यक्ष पदासाठी निवडला जाईल अशी देखील चर्चा पक्ष संघटनेत सुरू आहे. काँग्रेसकडे भंडारी समाजातील प्रदेशाध्यक्ष असल्यानेही भाजपकडून दामू नाईक किंवा पर्वतकर यांचे नाव प्रदेशाध्यक्ष म्हणून निश्चित केले जाऊ शकते.