शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गोवा भाजपाला ऑक्टोबरमध्ये मिळणार नवे प्रदेशाध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 11:42 IST

गोवा प्रदेश भाजपाला नवे अध्यक्ष येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत मिळणार आहेत. भाजपाच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया येत्या महिन्यात सुरू होईल.

ठळक मुद्देगोवा प्रदेश भाजपाला नवे अध्यक्ष येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत मिळणार आहेत.भाजपाच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया येत्या महिन्यात सुरू होईल.राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपलेला आहे.

पणजी - गोवा प्रदेश भाजपाला नवे अध्यक्ष येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत मिळणार आहेत. भाजपाच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया येत्या महिन्यात सुरू होईल. ही प्रक्रिया सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालेल व गोवा भाजपाला नवे प्रदेशाध्यक्ष मिळतील, असे पक्ष सुत्रांनी सांगितले.

राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपलेला आहे. भाजपाची सदस्य नोंदणी मोहीमही लवकरच सुरू होईल. मग पक्ष संघटनेत विविध स्तरांवरील निवडणुका होतील. उत्तर व दक्षिण गोव्यासाठी जिल्हा अध्यक्षही निवडले जातील. भाजपाच्या विविध मोर्चाचे अध्यक्ष निवडले जातील आणि शेवटी प्रदेशाध्यक्ष निवड होईल. 

प्रदेशाध्यक्ष पदासाठी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा विचार केला जाईल असे प्रारंभी अनेकांना वाटत होते पण आता स्थिती बदलली आहे. पार्सेकर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविले जाणार नाही अशी माहिती मिळाली. राजकीयदृष्टय़ा भाजपा कोणतीही नियुक्ती करताना जातीय समीकरणांचा खूप विचार करतो. मुख्यमंत्री मराठा समाजातील आहेत व प्रदेशाध्यक्षही मराठा समाजातील असे भाजपा होऊ देणार नाही, असे एका जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले. सदानंद शेट तानावडे हेही मराठा समाजातील आहेत व त्यामुळे त्यांचाही विचार प्रदेशाध्यक्ष पदासाठी होण्याची शक्यता काही जणांना खूप कमी वाटते. यापूर्वीच्या काळात राजेंद्र आर्लेकर, श्रीपाद नाईक आदींनी भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले आहे. यावेळी नव्या रक्ताला वाव दिला जाईल. दामू नाईक यांचेही नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी पुढे येऊ शकते किंवा पुन्हा आर्लेकर यांच्या नावाचा देखील विचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पक्षात त्याविषयी अजून गंभीरपणे विचार झालेला नाही असे एका नेत्याने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा