शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गोवा भाजपाची वेबसाईट ‘हॅक’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 18:47 IST

गोवा भाजपाची अधिकृत वेबसाईट सोमवारी हॅक झाल्याचे आढळून आले.

पणजी: गोवाभाजपाची अधिकृत वेबसाईट सोमवारी हॅक झाल्याचे आढळून आले. या वेबसाईटवर वेबसाईट हॅक करण्यात आल्याची सूचना होती व पाकिस्तान जिंदाबादची घोषणाही होती. परंतु नंतर उशिरा या वेबसाईटवर पुन्हा ताबा मिळविण्यास भाजपच्या आयटी विभागाकडून निकराचे प्रयत्न सुरू होते. गोवा भाजपच्या वेबसाईटवर ‘हॅक्कड’ असा संदेशासह पाकिस्तान जिंदाबादची घोषणाही होती. त्यामुळे वेबसाइट हॅक करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर ही वेबसाइट पुन्हा ताब्यात घेण्याचे प्रयत्न पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून सुरू होते. त्यात यश आल्याचेही पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. संध्याकाळी या वेबसाईटवर हॅक्कड संदेश व पाकिस्तान जिंदाबादची घोषणाही हटविण्यात आली होती. त्या जागी ‘भारतीय जनता पार्टी’ जय हिंद, जय भारतची घोषणा होती. परंतु वेबसाईट अंडर कन्स्ट्रक्शनचा बॅनर दिसत असल्यामुळे लोकांना ती वापरता येत नव्हती.या विषयी पक्षाचे सरचिटणीस सदानंद तनावडे यांना विचारले असता ती पक्षाची फार जुनी वेबसाईट असल्याचे त्यांनी सांगितले. ती वापरलीही जात नव्हती, त्यामुळे फारसे काही बिघडले नाही असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात पोलीसातही अद्याप तक्रार देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा