शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
2
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
3
"AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, फक्त..." अरविंद केजरीवालांचे मोठे विधान
4
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
6
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
7
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
8
मुंबई मनपानं नोटीस बजावली, तरीही २९ महाकाय होर्डिंग जसेच्या तसे!
9
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
10
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
11
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
12
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
13
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
14
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
15
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
16
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
17
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
18
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
19
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
20
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय

गोव्यात भाजपा विघटनाच्या वाटेवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 10:05 PM

मनोहर पर्रीकर यांच्याकडे कमकुवत उमेदवारांनाही जिंकून आणण्याची ताकद होती. ती संपली तर भाजपाच्या आश्रयाला कोण राहील?

- राजू नायकगोव्यात भाजपात घमासान सुरू आहे. मनोहर पर्रीकर व पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी आणि संघाने खतपाणी घालून वाढविलेला हा पक्ष विघटनाच्या मार्गावर तर उभा नाही ना, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे.भाजपाचे १३ आमदार २०१७च्या विधानसभा निवडणुकीत जिंकून आले. त्यात सर्वाधिक सात जण ख्रिस्ती होते. ख्रिस्ती चर्च या वेळी भाजपाबरोबर नव्हती. तरीही या ख्रिस्ती उमेदवारांना जनतेची पसंती मिळाली. सध्या त्यांच्यात चलबिचल सुरू आहे; कारण मोदी-शहांची राजवट अल्पसंख्याकांना मान्य नाही. दुस-या बाजूला मनोहर पर्रीकर यांना अल्पसंख्याकांची असलेली सहानुभूती कमी झाली आहे. पर्रीकर आजारी असतानाही सत्तेला चिकटून आहेत, त्यामुळेही लोक नाराज आहेत.गेल्या आठवडय़ात पर्रीकरांनी दोघा आजारी मंत्र्यांना काढून दोन नवे मंत्री घेतले. त्यात एक जरी ख्रिस्ती आमदार असला तरी, त्यात मायकल लोबो यांचा समावेश ते करू शकले नाहीत. लोबो यांनी २०१७मध्ये गोव्यात भाजपाचे सरकार स्थापन होण्यासाठी प्रयत्न केले- आपल्याला डावलले गेल्याचा त्यांना राग आलाय, स्वाभाविकच त्यांनी पर्रीकरांवरच आगपाखड केलीय. ‘पर्रीकर यांचे आरोग्य एकदमच बिघडले आहे. त्यात कसलाही सुधार नाही,’ असे ते बोलले. भाजपाचा आमदार एवढे तिखट बोलण्याची ही पहिलीच वेळ.पर्रीकरांचा आजार गंभीर असल्यानेच विरोधकही कधी नव्हे ते टीकेचे सूर लावू लागलेत; परंतु भाजपाचे सदस्य, विशेषत: ख्रिस्ती आमदार टीका करू लागलेत याचा अर्थ ते कमालीचे अस्वस्थ आहेत आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडून जाऊ शकतात. भाजपा गोव्यात पुन्हा सत्तेवर येऊ शकणार नाही, असे वाटले तर भाजपाला मोठेच खिंडार पडू शकते. मनोहर पर्रीकर यांच्याकडे कमकुवत उमेदवारांनाही जिंकून आणण्याची ताकद होती. ती संपली तर भाजपाच्या आश्रयाला कोण राहील?ज्या पद्धतीने गोवा फॉरवर्ड पक्ष स्थापन झाला, तसाच आणखी एक पक्ष तयार करावा किंवा गोवा फॉरवर्डमध्येच प्रवेश करावा, असे मनसुबे गोव्यात रचले जात आहेत. काँग्रेस पक्षातील असंतुष्ट बाबूश मोन्सेरात, ज्योकी-युरी आलेमाव पितापुत्रद्वयी वगैरेंनी यापूर्वीच गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश घेतला आहे. लोबो यांच्या अस्वस्थतेला ज्या पद्धतीने गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी पाठिंबा दिला आहे, तो पाहिला तर लोबो नजीकच्या काळात त्या पक्षाच्या आश्रयाला येऊन गोव्यात नवी राजकीय व्यूहरचना तयार करू शकतात, असे संकेत मिळतात.(लेखक गोवा आवृत्तीचे  संपादक आहेत.) 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण