शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात भाजपाला विधानसभेच्या तीन जागा, काँग्रेसला मिळाली एक जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 12:49 IST

गोव्यात भारतीय जनता पक्षाने विधानसभेच्या चारपैकी तीन जागांवर विजय प्राप्त केल्यात जमा झाले आहे.

पणजी : गोव्यात भारतीय जनता पक्षाने विधानसभेच्या चारपैकी तीन जागांवर विजय प्राप्त केल्यात जमा झाले आहे. केवळ पणजी वगळता मांद्रे, शिरोडा व म्हापसा या तीन मतदारसंघांमध्ये भाजपाने पोटनिवडणूक जिंकली. मांद्रे, शिरोडा, म्हापसा व पणजी या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका झाल्या होत्या. पणजीत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे तर म्हापशात माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली.या पोटनिवडणुकीत भाजपाविरुद्ध काँग्रेस, अशी जोरदार टक्कर झाली. म्हापसा व पणजी हे भाजपचे बालेकिल्लेच बनले होते. त्यापैकी पणजीच्या बालेकिल्ल्याला काँग्रेसने सुरूंग लावला. मोन्सेरात यांना काँग्रेसने तिकीट दिल्याने पणजीत भाजपा हरला. पर्रीकर यांना जर वगळले तर भाजपा म्हणजे काहीच नव्हे, अशी प्रतिक्रिया मोन्सेरात यांनी जिंकल्यानंतर व्यक्त केली.शिरोडा मतदारसंघात भाजपविरुद्ध महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अशी जोरदार लढत झाली. शिरोडय़ात काँग्रेस पक्षाचे उमेदवार महादेव नाईक हे तिस-या स्थानी पोहोचले. भाजपचे सुभाष शिरोडकर फक्त 66 मतांनी जिंकला. मगो पक्षासाठी हा फार मोठा धक्का ठरला आहे. कारण मगोपने भाजपविरुद्ध शिरोडा मतदारसंघात उमेदवार उभा करू नये अशी विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मगोपला केली होती. मगोपने शिरोडय़ात उमेदवार उभा केल्यानेच सुदिन ढवळीकर यांना भाजपने मंत्रिमंडळातून डच्चू दिला होता. ढवळीकर त्यावेळी भाजपप्रणीत आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री होते. म्हणजेच मगोपने उपमुख्यमंत्रीपदही गमावले. तसेच मगोपचे दोन आमदारही फुटून भाजपमध्ये गेले. सुदिन ढवळीकर आता एकाकी पडले आहेत. त्यांचे बंधू तथा मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांचा हा सलग दुसरा पराभव आहे.म्हापशात फ्रान्सिस डिसोझा यांचे पुत्र जोशुआ डिसोझा यांनी काँग्रेसला टक्कर देण्यात यश मिळविले. मांद्रे मतदारसंघात भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे यांना अपक्ष उमेदवार जित आरोलकर यांनी टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र सोपटे यांना यशस्वी होण्यापासून कोणच रोखू शकले नाहीत. माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोपटेंना पोटनिवडणुकीत सहकार्य केले नाही. पार्सेकर समर्थकांची मते आरोलकर व काँग्रेसचे बाबी बागकर यांना विभागून गेली.

टॅग्स :goaगोवा