शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Goa: रेल्वे प्रवासात साखरझोप पडली महागात, तब्बल ४.२५ कोटींचं सोने असलेली बॅग चाेरट्यांनी पळवली

By सूरज.नाईकपवार | Updated: May 4, 2023 10:43 IST

Konkan Railway: मुंबईहून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका सराफाला रेल्वे प्रवासातील साखरझोप बरीच महागात पडली.  गोव्यातील काणकोण येथील क्रॉसिंगजवळ रेल्वे थांबली असता, अज्ञात चोरट्यांने त्यांची सोने असलेली बॅग पळविली.

- सूरज नाईक पवार 

मडगाव : मुंबईहून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका सराफाला रेल्वे प्रवासातील साखरझोप बरीच महागात पडली.  गोव्यातील काणकोण येथील क्रॉसिंगजवळ रेल्वे थांबली असता, अज्ञात चोरट्यांने त्यांची सोने असलेली बॅग पळविली. बॅगेत चार कोटी पंचवीस लाखांचे सुवर्णलंकार होते. अशोक आर असे या सरफाचे नाव असून, तो मूळ केरळ राज्यातील असून, मुंबईतील पनवेल भागात तो रहात आहे.

काणकोण येथील क्रॉसिंगवर रेल्वे थांबलेली असता पहाटे सुमारे तीनच्या दरम्यान चोरीची वरील घटना घडली. गुजरातहून केरळला जाणाऱ्या गांधीधाम हमसफर एक्स्प्रेसमधून अशोक आर प्रवास करीत होते. सोने असलेली बॅग खाली लॉक करून ते वरच्या बर्थवर झोपले होते. पहाटे रूळ बदलण्यासाठी रेल्वे कानकोण क्रॉसिंगवर थांबली असता चोरट्याने बॅगला लावलेली साखळी कापून नंतर बॅग पळवली.

ज्या जागेवर रेल्वे थांबली होती, तेथून काही अंतरावर फोडलेल्या अवस्थेत ती बॅग सापडली. खालच्या बर्थवर झोपलेल्या एका प्रवासाला कुणीतरी बॅग घेऊन जात असताना नजरेस पडला. त्याने नंतर अशोकला उठवले. बॅगची त्यांनी शोधाशोध घेतली. मात्र, ती सापडली नाही. कानकोण येथे पाेहोचल्यानंतर अशोक आर यांनी या चाेरीप्रकरणी तेथील रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. या चोरी प्रकरणाचा तपास चालू असल्याची माहिती कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे उपअधिक्षक गुरुदास कदम यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवाKonkan Railwayकोकण रेल्वे