शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : एकतर्फी प्रेमातून युवतीवर हल्ला, हल्लेखोर युवक दीड तासात ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 17:02 IST

‘व्हॅलेंनटाईन डे’च्याच दिवशी एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका युवकाने सकाळी कामावर जाणाऱ्या युवतीवर बियरच्या बाटलीने प्राणघातक हल्ला केला.

उसगाव : ‘व्हॅलेंनटाईन डे’च्याच दिवशी एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका युवकाने सकाळी कामावर जाणाऱ्या युवतीवर बियरच्या बाटलीने प्राणघातक हल्ला केला. या प्रकारात मयुरी महादेव वायंगणकर (वय २२, रा. तिराळ-उसगाव) हिच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तिच्यावर तिस्क उसगाव (पिळये) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयात प्राथमिक वैद्यकीय उपचार करण्यात आले. पुढील वैद्यकीय उपचारासाठी तिला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संशयित मंथन मंगेश गावडे ( वय २४ वर्षे , राहणारा पालवाडा उसगाव ) याला पोलिसांनी दीड तासात ताब्यात घेतले. 

घटनास्थळी व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी वायंगणकर ही युवती नेहमीप्रमाणे सकाळी कल्लभ-उडीवाडा येथे असलेल्या अळंबी उत्पादन करणाऱ्या फॅक्टरीत गोसावीवाडा-उसगाव मार्गे पायवाटेने चालक जात होती. गोसावीवाडा येथील भारत गॅस गोदामामागे झाडीत दडून बसलेल्या मंथन मंगेश गावडेने अचानक बाहेर येवून मयुरीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मयुरीने प्रतिकार करताच तिथे पडलेल्या रिकाम्या बियरच्या बाटलीने जोरदार प्रहार केला. तसेच तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचवेळी एक शेतकरी गुरे चरण्यासाठी घेवून येत होता. त्याला पाहून मंथन पळून गेला. मयुरी काही वेळ तिथेच जखमी अवस्थेत बसून राहिली. नंतर रक्ताळलेल्या अवस्थेत ती कशीबशी चालत फोंडा - वाळपई मार्गाबाजूला असलेल्या प्रभुदेसाई स्मशानभूमीजवळ आली. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. यावेळी तेथून जाणाऱ्या गृहरक्षक विनोद गावस यांनी तिला पाहिले. तातडीने १०८ रुग्णवाहिकेला माहिती देण्यात आली. तेथून जात असलेल्या पोलिस कर्मचारी आशीर्वाद प्रभू यांनी तिची चवकशी केली. दरम्यान, मयुरीचे कुटुंबीयही घटनास्थळी आले. 

तिराळ भागाचे पंच राजेंद्र नाईक आपल्या कारने मयुरीला तिस्क उसगाव (पिळये ) प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तेथून तिला गोमेकॉत दाखल केले.  हल्ल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंथनला पोलिसांनी दीड तासात ताब्यात घेतले. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी मंथन गावडेने युवकाने आपल्या प्रेमाला नकार देत असल्याबद्दल मयुरीला तिच्या घरी जावून मारहाण केली होती. त्यावेळी मयुरीच्या नातेवाईकांनी तिस्क - उसगाव पोलिस चौकीवर रीतसर तक्रार दिली होती. पुन्हा मयुरीच्या वाटेला जाणार नाही, असे त्यावेळी मंथन गावडेने लिहून दिले होते, अशी माहिती मयुरीच्या आई व मामाने दिली.