शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

फॉर्मेलिन मासेप्रश्नी गोंधळ सुरूच, सलग तिसऱ्या दिवशीही गोवा विधानसभा तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 13:09 IST

गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अजूनपर्यंत कामकाज झालेले नाही

पणजी : फॉर्मेलिनयुक्त मासळीच्या मुद्यावरून सलग तिसऱ्या दिवशी विरोधी काँग्रेस सदस्यांनी सभागृहात गदारोळ करत सभापतींना कामकाज तहकूब करण्यास भाग पाडले. 19 जुलै रोजी सुरू झालेल्या गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अजूनपर्यंत कामकाज झालेले नाही. 

फॉर्मेलिनयुक्त मासळीचा धग अजूनही निवळलेला नाही. सभापती प्रमोद सावंत यांना सलग तिसऱ्या दिवशीही कामकाज तहकूब करावे लागले. गोव्यात सोमवारी ( 23 जुलै) 11.30 वाजता प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला तेव्हा विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी उभे राहून फॉर्मेलिनयुक्त मासळीच्या मुद्यावरून पुन्हा स्थगन प्रस्तावाची मागणी केली. सभापती प्रमोद सावंद यांनी कामकाज नियमाचा दाखला देत स्थगन प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचे सांगितले. त्यावर विरोधी पक्षनेते कवळेकर यांनी नाराजी व्यक्त करताना नियमाचा आधार घेऊन  लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. विरोधकांनी सभापतीच्या आसनाजवळ जाऊन शेम शेमच्या घोषणा दिल्या. त्यानंतर सभापतींनी कामकाज 12.30 पर्यंत तहकूब केल्याचे जाहीर केले. 

गदारोळात एक प्रश्न

प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यानंतर भाजपाचे आमदार निलेश काब्राल यांचा एक प्रश्न चर्चेला आला. परंतु तोपर्यंत विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची मागणी करून गदारोळ सुरू केला होता. या गदारोळातच काब्राल यांनी प्रश्न विचारला व त्याचे उत्तरही नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी गदारोळातच दिले. परंतु उपप्रश्न विचारण्यापूर्वी सभापतींनी कामकाज तहकूब केल्याचे जाहीर केले. 

अहंकार नको : कवळेकर

फॉर्मेलिन हा लोकांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा असून अत्यंत गंभीर विषय आहे व त्यावर चर्चा व्हायला पाहिजे असे कवळेकर यांनी  सांगितले. या मुद्यावर अहंकार बाजूला सारून स्थगन प्रस्तावाला मंजुरी द्या असे कवळेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाFormalin Chemicalफॉर्मलीन केमिकल