शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022 : शिवसेनेने शब्द पाळला; उत्पल पर्रीकरांसाठी वेलिंगकर यांनी मागे घेतली उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 14:45 IST

Goa Assembly Elections: यापूर्वीही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपकडून उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी न मिळाल्यास त्यांचं समर्थन करण्याचं आवाहन केलं होतं.

Goa Assembly Elections: सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. यात गोव्याच्याही निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांच्या नावाची खुप चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. उत्पल पर्रीकर यांच्या समर्थनार्थ शिवसेनेने (Shiv Sena) आपल्या पणजी सीटवरील (Panjim Assembly Constituency) उमेदवार मागे घेतला आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं उत्पल पर्रीकर यांनी पणजीहून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्पल पर्रीकर यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अन्य पक्षांनी त्यांना पाठींबा द्यावा, असं आवाहन केलं होतं. संजय राऊत यांनी पणजीमधून शिवसेनेचा उमेदवार मागे घेण्यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनादेखील टॅग केलंय. "आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहोत. शिवसेनेचे पणजीचे उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. इतकंच नाही, आम्ही उत्पल पर्रीकर यांना पूर्ण समर्थन देऊ. पणजीची लढाई केवळ निवडणुकीपुरतीच नाही, तर गोव्याच्या राजकीय शुद्धीकरणाबाबत असल्याचं आमचं मानणं आहे," असं राऊत यांनी ट्वीटमध्ये नमूद केलंय. यासोबत त्यांनी उत्पल पर्रीकरांच्या एका वक्तव्यासोबतचा फोटोही जोडला आहे. "तुम्ही दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या प्रतिनिधित्व केलेल्या निवडणूक क्षेत्रात गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तिकिट द्याल का?," असं त्यात लिहिलं आहे.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Utpal Parrikarउत्पल पर्रिकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा