शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Goa Assembly Election 2022: निवडणूक निकालापूर्वी गोव्यात मुख्यमंत्रिपदासाठी विश्वजित राणे यांची फिल्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 10:53 IST

काँग्रेसमध्ये मायकल लोबो हेही मुख्यमंत्रीपदाचे एक दावेदार आहेत पण शेवटी पक्ष काय निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असे लोबो यांचे म्हणणे आहे.

सदगुरू पाटीलपणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले पण मतमोजणी होण्यास अजून २५ दिवसांचा कालावधी असताना कालपासूनच सत्तेसाठी दोन प्रमुख पक्षांचे लॉबिंग सुरू झाले. मुख्यमंत्रीपदासाठीही खेळी सुरू झाल्या आहेत. भाजपचे एक मंत्री तथा प्रबळ नेते विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावे म्हणून जोरदार धडपड सुरू केली आहे.

विधानसभेच्या चाळीसपैकी एकवीस जागा ज्या पक्षाला किंवा आघाडीला प्राप्त होतील, तो पक्ष किंवा आघाडी सरकार स्थापन करू शकेल. काँग्रेस पक्षाने आपल्या सर्व उमेदवारांची एकत्रित बैठक काल पणजीत घेतली. त्या बैठकीला विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार दिगंबर कामत उपस्थित होते. काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीही बैठकीत भाग घेतला. गोव्यात काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांच्या युतीचे सरकार स्थापन होईल असा दावा चोडणकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केला. भाजपला चाळीसपैकी दहाहून कमी जागा मिळतील असे चोडणकर म्हणाले. एकदा मतमोजणी जाहीर झाल्यानंतर लगेच पाच मिनिटांत आम्ही मुख्यमंत्री कोण ते निश्चित करू आणि दहा मिनिटांत राजभवनवर जाऊन सरकार स्थापनेचा दावा करू, असे गेल्याच आठवड्यात चोडणकर म्हणाले होते.

काँग्रेसमध्ये मायकल लोबो हेही मुख्यमंत्रीपदाचे एक दावेदार आहेत पण शेवटी पक्ष काय निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असे लोबो यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्रीपदासारख्या विषयांवर काँग्रेसचे निर्णय पक्षश्रेष्ठींच्या स्तरावर होतील, असे कामत यांचे म्हणणे आहे.दरम्यान, ७९ टक्के मतदान झाल्याने हे मतदान सरकारविरोधी असल्याचे सर्वसामान्यपणे गोव्यात मानले जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी मात्र भाजप २२ जागा जिंकेल व पुन्हा सरकार स्थापन करील असे म्हटले आहे. 

विजयी होण्याची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात

भाजपमधील महत्त्वाकांक्षी नेते विश्वजित राणे यांनी डावपेच सुरू केले आहेत. भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी जर पाच-सहा दुसऱ्या पक्षाचे किंवा अपक्ष आमदार सोबत घ्यावे लागले तर ते संख्याबळ आपण आणू शकतो, असे विश्वजित राणे यांनी भाजपच्या काही नेत्यांना सांगितले आहे. राणे यांचा मुख्यमंत्रीपदावर दावा आहे याची कल्पना पक्षातील आमदारांना आली आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष तसेच काही संभाव्य अपक्ष उमेदवार (जे विजयी होण्याची शक्यता आहे) त्यांच्या संपर्कात विश्वजित आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष तीन जागा जिंकण्याची शक्यता असल्याने विश्वजित यांनी त्या पक्षाच्या नेत्यांशी संवाद वाढवला आहे. भाजपला बहुमत मिळाले नाही तर अपक्ष व म.गो. पक्षाच्या आमदारांना भाजपच्या बाजूने आणण्याचे कौशल्य विश्वजित राणे यांच्याकडे आहे. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२