शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Goa Assembly Election 2022 Rahul Gandhi: पाच वर्षांपूर्वी भाजपनं चोरीनं मिळवली होती गोव्याची सत्ता; राहुल गांधींचा भाजपवर टीकेचा बाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 17:32 IST

Goa Assembly Election Latest News Rahul Gandhi: पाच वर्षांपूर्वी गोव्याच्या जनतेनं भाजपला जनमत दिलं नव्हतं, त्यांनी चोरीनं सत्ता मिळवली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Goa Assembly Election Latest News Rahul Gandhi: गोव्यात १४ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान घेतलं जाणार आहे. एकीकडे भारतीय जनता पक्ष (BJP) डबल इंजिन सरकार आणि विकास कामांचे मुद्दे घेऊन लोकांच्या समोर जात आहे, तर दुसरीकडे काँग्रेसलाही (Congress) या निवडणुकीत आपल्याला विजय मिळेल अशी अपेक्षा आहे. गोव्यातील आगामी निवडणुकांपूर्वी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसंच सत्तेत आल्यानंतर त्वरित गोव्यात स्थायी आणि कायदेशीर पद्धतीनं खाणकाम योजना सुरू केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

"यावेळी आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल आणि गोव्यात काँग्रेसचेच सरकार स्थापन व्हावे यासाठी आम्ही तातडीने काम करू," असे काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी सांगितलं. गोव्यात बेरोजगारी ही मोठी समस्या बनली आहे. गोव्यातील प्रत्येक तरुणाला येथे नोकऱ्या नाहीत याची कल्पना आहे. पर्यटनाच्या स्थितीबाबतही काय झालंय हे सर्वांनाच माहीत आहे. भाजपने गोव्यात गेली पाच वर्षे जे राज्य केले, ते त्यांनी चोरीच्या माध्यमातून मिळवलं आहे. गोव्यातील जनतेला काँग्रेसला सत्तेवर आणायचे होते, मात्र भाजपने भ्रष्टाचार करून पैसे देऊन येथे सरकार स्थापन केले. भाजपने गेल्या ५ वर्षात एकही विकासकाम केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. २०१२ पूर्वी गोव्यात विकास झाला नसल्याचं भाजपनं म्हटलं पण सत्य गोव्यातील जनतेला माहीत आहे. आम्हाला गोव्यातील लोकांचा आवाज ऐकायचा आहे आणि त्यांच्या मताचा आदर करायचा आहे, असे राहुल गांधी म्हणाले. इतर पक्षातून येऊन काँग्रेसच्या नावाने जिंकणारे असे लोक आम्हाला नको आहेत असंही गोव्यातील जनतेनं सांगितल्याचं ते म्हणाले.

पंतप्रधानांच्या वक्तव्यावरही उत्तरराहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेवरही उत्तर दिलं. गोव्याला पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यासाठी काँग्रेस सरकारला १५ वर्षे लागल्याचं ते म्हणाले होते. "त्यांना (पंतप्रधान) त्यावेळचा इतिहास समजत नाही," असं उत्तर त्यांनी यावेळी दिलं. बोलताना त्यांनी हिजाबच्या मुद्द्यावरही आपली प्रतिक्रिया दिली. लोकांचे लक्ष विचलित करणाऱ्या अशा संभाषणात मी सहभागी होणार नाही. माझे लक्ष त्यांच्यासाठी (लोकांसाठी) काय महत्त्वाचे आहे यावर असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी