शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Goa Assembly Election 2022: आदित्य ठाकरे प्रचाराला गोव्याच्या मैदानात, शिवसेना यावेळी चमत्कार करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 15:07 IST

Goa Assembly Election 2022: येत्या 14 फेब्रुवारीला गोव्यात मतदान होत असून घरोघरी जाऊन सर्वच सर्वच पक्ष प्रचार करण्यावर  भर देत आहेत.त्यात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री Aditya Thackeray हे ही आता गोव्याच्या मैदानात प्रचाराला उतरत आहेत.

मुंबई -  गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजप, कॉंग्रेस, आप आणि तृणमूल कॉंग्रेससह विविध राजकीय पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी आरोप प्रत्यारोप करत आहेत. येत्या 14 फेब्रुवारीला गोव्यात मतदान होत असून घरोघरी जाऊन सर्वच सर्वच पक्ष प्रचार करण्यावर  भर देत आहेत.त्यात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे हे ही आता गोव्याच्या मैदानात प्रचाराला उद्या उतरत आहेत.

उद्यापासून आदित्य ठाकरे जाणारगोवा विधानसभा निवडणुकीचे मतदान चार दिवसांवर उरलेले असताना महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे शुक्रवारपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ठाकरे वास्को, पेडणे, साखळी येथे सभा घेऊन शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

शिवसेनेने कंबर कसलीगोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली असून ९ उमेदवारांची यादी आज जाहीर केली. यासोबतच शिवसेना एकूण गोव्यात १० ते १२ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तसंच गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे युवा नेते आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत.

अदित्य ठाकरेंचा दौराशुक्रवारी दुपारी २.३० वाजता आदित्य ठाकरे यांचे दाबोळी विमानतळावर आगमन होणार आहे. दुपारी ३ वाजता ते वास्को येथील सभेला संबोधित करतील. तर, सायंकाळी ५.१५ वाजता पेडणे येथील सभेला संबोधित करतील. शनिवारी सकाळी ११.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर दुपारी २ वाजता त्यांची साखळीत सभा होईल. तर सायंकाळी ४ ते ४.३० या वेळेत ते म्हापसा बाजारपेठ परिसरात घरोघरी भेट देऊन प्रचार करतील. 

शिवसेनेला यंदा तरी यश मिळणार का ?दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना गोवा विधानसभा निवडणूक लढवत आहे. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व युती केली असून, शिवसेनेने पेडणे, शिवोली, म्हापसा, साखळी, मांद्रे, हळदोणा, पर्ये, वाळपई, वास्को, केपे आणि कुठ्ठाळी या ११ मतदारसंघांत उमेदवार उतरवले आहेत. शिवसेनेने पणजीतही उमेदवार दिला होता. पण, पणजीतून माघार घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेल्या माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे सुपूत्र उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाGoa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२