शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

गोव्यात कोंकणीपेक्षा मराठीतून अर्ज दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 19:19 IST

वर्षभरात विविध कार्यालयात मराठीतून ३७२ अर्ज तर कोंकणीतून अर्ज करणाऱ्यांची संख्या १३५ एवढीच आहे.

पणजी: गोव्याची  कोंकणी ही राजभाषा असली आणि संवादासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी भाषा असली तरी सरकारी कार्यालयात अर्ज करण्यासाठी कोंकणीपेक्षा मराठीचा अधिक वापर होत असल्याचे आढळून आले आहे. वर्षभरात विविध कार्यालयात मराठीतून ३७२ अर्ज तर कोंकणीतून अर्ज करणा-यांची संख्या १३५ एवढीच आहे.गोवा विधानसभेत कॉंग्रेसचे आमदार टोनी फर्नांडिस यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती उघड झाली. राज्यातील सर्व ५३ खात्यातील सर्व  कार्यालयात अर्ज करणा-यात इंग्रजीतून अर्ज करणा-यांची संख्या अजूनही फार मोठी आहे. इंग्रजी नंतर मराठीतून अर्ज करणा-यांची संख्या सर्वात मोठी आहे. कोंकणीतून अर्ज  करणा-यापेक्षा दुप्पट अर्ज मराठीतून आले आहेत. १३५ अर्ज कोंकणीतून तर ३७२ अर्ज हे मराठीतून आहेत असे उत्तरात म्हटले आहे. मराठीतून अर्ज  कला आणि संस्कृती खात्यात अधिक आले आहेत. मराठीतून २०५ तर कोंकणीतून ४४ अर्ज करण्यात आले आहेत. त्यानंतर क्रमांक माहिती आणि प्रसिद्धी खात्याचा लागतो. या खात्यात मराठीतून ११० अर्ज तर कोंकणीतून ४७ अर्ज आले आहेत.  कोंकणीतून सर्वाधिक अर्ज मिळण्याचे एकमेव खाते म्हणजे गोवा राजभाषा संचालनालय. या खात्याला ३९ अर्ज कोंकणीतून तर १० अर्ज मराठीतून आले आहेत.

टॅग्स :goaगोवा