शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Goa: दिव्यांग सक्षमीकरण खात्यात सर्व सुविधा उपलब्ध, मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 15:17 IST

Goa News: राज्यात दिव्यांग सक्षमीकरण खात्याची सुरवात एप्रिलपासून हाेणार असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.  या खात्यामार्फत आता दिव्यांगांना सर्व सुविद्या उपलब्ध असणार आहे, असे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

- नारायण गावस  पणजी - राज्यात दिव्यांग सक्षमीकरण खात्याची सुरवात एप्रिलपासून हाेणार असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.  या खात्यामार्फत आता दिव्यांगांना सर्व सुविद्या उपलब्ध असणार आहे, असे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सुरु केलेल्या प्रधानमंत्री दिव्यांशा केंद्रामार्फत त्यांचे हस्ते  दिव्यांगांना विविध उपकरणांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत सांताक्रुझचे आमदार रुदोल्फ फर्नांडिस राज्य दिव्यांग आयाेगाचे आयुक्त गुरुप्रसाद पाऊसकर, समाज कल्याण खात्याचे संंचालक अजित पंचवाडकर डॉ. शुभम पवार व इतर सदस्य उपस्थित होते.

मंत्री फळदेसाई म्हणाले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पुढाकाराने हे दिव्यांग खाते तयार झाले आहे. राज्यातील दिव्यांगाच्या समस्या आता सोडविण्यात आणखी साेपे हाेणार आहे. आम्ही राज्यातील  दिव्यांगासाठी विविध योजना राबवित आहोत. प्रधानमंत्री िदिव्यांग केंद्र हे त्यासाठी खुले केले आहे. आता दिव्यांगना आपल्या उपकरणासाठी वाट पाहावी लागणार नाही. या केंद्रात नाेंदणी केल्यावर त्यांना त्याची उपकरणे मिळतात. 

महिन्याभरात या केंद्रामार्फत एकूण २९ लाखांची ३१२ विविध उपकरणे दिव्यांगाना दिली आहे. याता व्हीलचेयर, कानांची उपकरणे अशा अन्य विविध उपकरणांचा समावेश आहे.  प्रती दिन या केंद्रात १५ जणांची नाेंदणी हाेत आहेत, असे मंत्री फळदेसाई म्हणाले.

मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, पर्पल फेस्ट २०२४ मार्फत अनेक दिव्यांगांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. या महोत्सवाला एक लाख लोकांनी आपली उपस्थिती लावली. दिव्यांगाना सर्व योजनांचा लाभ मिळावा त्यांना त्यांचा अधिकार मिळावे समाजात त्यांना योग्य स्थान  मिळावे हा आमचा मुख्य उद्देश आहे. राज्यात एकही दिव्यांग सुविधापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न सुरु आहे. या केंद्रामध्ये आता दिव्यांगना लाखो रुपयांची उपकरणे सहज मिळत आहेत. आता दिव्यांगसाठी प्रत्येक केद्रांवर वाहनाच सोयही केली जाणार आहे.

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार