शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात काँग्रेसचे सर्व १६ आमदार एकसंध, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 19:58 IST

गोव्यात काँग्रेसचे सर्व सोळाही आमदार एकसंध असल्याचा दावा विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी केला असून पक्षात कोणतीही फूट पडणे शक्य नाही, असे म्हटले आहे.

पणजी : गोव्यात काँग्रेसचे सर्व सोळाही आमदार एकसंध असल्याचा दावा विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी केला असून पक्षात कोणतीही फूट पडणे शक्य नाही, असे म्हटले आहे.आमदार दिगंबर कामत यांच्यासह पक्षाचे काही आमदार काँग्रेसमधून राजीनामा देऊन बाहेर पडण्याच्या आणि हा गट भाजप सरकारला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त गेले काही दिवस सोशल मीडियावर फिरत आहे. या निव्वळ अफवा आहेत. भाजपा सरकार सध्या व्हेंटिलेटरवर आहे. सरकारमधील घटक पक्ष तसेच त्यांचे स्वत:चेच आमदार सरकारच्या कारभारावर समाधानी नाहीत, हे भाजपाला कळून चुकले आहे, त्यामुळे भाजपाकडूनच या अफवा पसरविल्या जात आहेत, असे कवळेकर यांनी म्हटले आहे.दिगंबर कामत यांच्यासह फिलिप नेरी रॉड्रिग्स, सुभाष शिरोडकर व टोनी फर्नांडिस कॉंग्रेसमधून फुटणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर फिरत आहे. यासंबंधी कवळेकर पुढे म्हणतात की, राज्यातील भाजपा आघाडी सरकार आपणहून कोसळण्याच्या मार्गावर आहे. भाजपाचे आमदार आणि सरकारमधील घटक पक्ष समाधानी नाहीत, त्यामुळे अशा अफवा पसरवून बचावात्मक राजकारणाची घाणेरडी खेळी भाजपा खेळत आहे.कवळेकर पुढे म्हणतात की, अनेक मंत्री, आमदार आजारी आहेत. कामे होत नसल्याने कार्यकर्त्यांकडून वाढता दबाव आहे.काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध आणि पक्षाशी एकनिष्ठ आहेत. गेले दीड वर्ष विधानसभेही सोळाही आमदारांनी एकी दाखवली आहे. सर्व १६ आमदार पक्षासोबत असून ही एकी पुढेही कायम राहणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस