शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोवा: बाबूशचे पुन्हा सांताक्रुझ चलो रे, आज कार्यालयाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 21:24 IST

कधी काँग्रेस, कधी युगोडेपा तर कधी युजी पार्टीच्या तिकीटावर निवडणुका लढविणारे माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पुन्हा एकदा चलो सांताक्रुझ अशी घोषणा केली आहे.

पणजी : कधी काँग्रेस, कधी युगोडेपा तर कधी युजी पार्टीच्या तिकीटावर निवडणुका लढविणारे माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पुन्हा एकदा चलो सांताक्रुझ अशी घोषणा केली आहे. पणजी मतदारसंघात कुठेच लुडबूड न करता मोन्सेरात यांनी पुन्हा सांताक्रुझ मतदारसंघातूनच आपले राजकीय भवितव्य नव्याने घडवायचे असे ठरविले आहे. रविवारी मोन्सेरात हे गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्यालय सांताक्रुझ येथे सुरू करत आहेत.उद्घाटन सोहळा रविवारी सकाळी अकरा वाजता पार पडेल. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे. मोन्सेरात यांनी 2012 साली सांताक्रुझ मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती व ते जिंकले होते. नंतर त्यांची पक्षविरोधी कारवायांमुळे काँग्रेसमधून त्यावेळचे प्रदेशाध्यक्ष लुईङिान फालेरो यांनी हकालपट्टी केली होती. मोन्सेरात यांनी यापुढे चार वर्षानी होणारी विधानसभा निवडणूक ही गोवा फॉरवर्डच्या तिकीटावर सांताक्रुझमधूनच लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ताळगाव किंवा पणजीमधून ते लढणार नाहीत, असे त्यांच्या कार्यकत्र्यानी सांगितले. सांताक्रुझ- कालापुर रस्त्याला टेकून पूर्वी जिथे काँग्रेसचे कार्यालय होते, तिथेच गोवा फॉरवर्डचा नामफलक आज लावला जाणार आहे. मोन्सेरात यांनी सांताक्रुझची पंचायतही आपल्याकडे वळवली आहे. 2007 साली मोन्सेरात यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात यांनी युगोडेपाच्या तिकीटावर सांताक्रुझमधून निवडणूक लढवली होती पण जेनिफर तिथे पराभूत झाल्या होत्या. मोन्सेरात यांनी 2क्17 सालची विधानसभा निवडणूक पणजी मतदारसंघातून युजी पार्टीच्या (युगोडेपा नव्हे) तिकीटावर लढवली पण ते पणजीत हरले. आता मोन्सेरात यांनी पणजीत सध्या तरी हस्तक्षेप करायचाच नाही असे ठरवले आहे. पणजी मतदारसंघाचे नेतृत्व सध्या मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे करत आहेत. मोन्सेरात यांना बक्षिस म्हणून भाजपकडून ग्रेटर पणजी ही नवी पीडीए दिली जाणार आहे. सांताक्रुझ मतदारसंघात काँग्रेसला शह देण्यासाठी गोवा फॉरवर्डला आणि भाजपलाही सांताक्रुझमध्ये बाबूशचा वापर करता येईल, अशी चर्चा भाजपच्या आतिल गोटात सुरू आहे. सांताक्रुझ मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सध्या काँग्रेस पक्ष करत आहेत. टोनी फर्नाडिस हे तिथे काँग्रेसचे आमदार आहेत. 

टॅग्स :goaगोवा