शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Goa: विकलेला फ्लॅट दुसऱ्यांदा विकून १२ लाखांचा गंडा घालून फरार झालेला आरोपी हैदराबादातून जेरबंद

By सूरज.नाईकपवार | Updated: March 18, 2024 20:41 IST

Goa News: आधीच विकलेला फ्लॅट अन्य एकाला विकून त्याच्याकडील १२ लाखांची रोकड घेउन फरार झालेल्या भामटयाला गाेव्यातील फातोर्डा पोलिसांनी तेलंगणा राज्यातील हैदरबाद येथे जेरबंद केले. भास्कर बेगारी (४६) असे संशयिताचे नाव असून, तो मूळ आंध्र प्रदेश राज्यातील आहे.

- सूरज नाईकपवार मडगाव - आधीच विकलेला फ्लॅट अन्य एकाला विकून त्याच्याकडील १२ लाखांची रोकड घेउन फरार झालेल्या भामटयाला गाेव्यातील फातोर्डा पोलिसांनी तेलंगणा राज्यातील हैदरबाद येथे जेरबंद केले. भास्कर बेगारी (४६) असे संशयिताचे नाव असून, तो मूळ आंध्र प्रदेश राज्यातील आहे. १ ऑगस्ट २०१४ साली ही घटना घडली होती. गोव्यात आणल्यानंतर त्याला न्यायालयात उभे केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. हैदरबाद येथील मियापूर येथे पोलिसांनी भास्करच्या मुसक्या आवळल्या.

नंतर त्याला ट्रान्झिट वाँरन्टवर गोव्यात आणल्याची माहिती दक्षिण गोवा पोलिस अधिक्षक सुनिता सावंत यांनी दिली. फातोर्डा पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात सुरेंद्र नाईक यांनी तक्रार नोंदविली होती. तक्रारदाराच्या आईला संशयिताने गंडविले होते. आगाळी घोगळ येथील लत्ता रेसिडेन्सी या इमारतीतील सदनिका त्याने तक्रारदाराच्या आईला विकली होती.फ्लॅट खरेदीबाबत नोंदणीसाठी सबरजिस्टार कार्यालयात ती गेली असता , सदर फ्लॅट यापुर्वीच संशयिताने अन्य एकाला विकल्याचे स्पष्ट झाले होते.

मागाहून या प्रकरणी फातोर्डा पोलिस ठाण्यात तक्रार नोंद झाल्यानंतर भास्कर विरुध्द फसचणुकीचा गुन्हा नोंद झाला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश गावकर यांनी या प्रकरणाचा तपास करताना , शेवटी संशयिताला गजाआड केले.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी