शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गोवा: पार्टी करून परतताना अपघात, दोन तरूणांचा मृत्यू तर दोघं जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 16:50 IST

रविवारी पहाटे म्हापसा शहरापासून तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या आसगाव येथील धोकादायक वळणावर गाडीला झालेल्या अपघातात वाहन चालकासहित दोघांचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत.

म्हापसा: रविवारी पहाटे म्हापसा शहरापासून तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या आसगाव येथील धोकादायक वळणावर गाडीला झालेल्या अपघातात वाहन चालकासह दोघांचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरु करण्यात आले आहेत. अपघातातील सर्व जण येथील कॉलेजचे विद्यार्थी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना पहाटे तीनच्या दरम्यान सावंतवाडी आसगांव येथे घडली. अपघातग्रस्त जीए-०५-बी-३५३२ या गाडीतील सर्व जण कांदोळी येथील किनारी भागात पार्टीसाठी गेले होते. तेथून घरी जात असताना वाहन चालक इथेन व्हिएगस याचा वळणावर वाहनावरील नियंत्रण गेल्याने वाहनाची धडक रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका घराच्या संरक्षक भिंतीला जोरदारपणे धडकली. त्यात इथेन व्हिएगस याचा जागीत मृत्यू झाला तर ली अ‍ॅना रोचा या युवतीचा उपचारा दरम्यान बांबोळी येथील गोवा वैद्यकिय महाविद्यालयात मृत्यू झाला. गाडीतील इतर दोन जखमी लियोन परेरा व झहीद शेख यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. हे सर्वजण १९ ते २१ दरम्यानच्या वयोगटातील असून म्हापसा येथील एका नामांकित कॉलेजचे विद्यार्थी आहेत.  घटनेनंतर लागलीच सर्वांना उपचारासाठी उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यावेळी इस्पितळातील डॉक्टरांनी इथेन व्हिएगस याला मृत घोषीत केले. ली अ‍ॅना रोचा या युवतीला तेथून बांबोळीला हलवण्यात आले. तेथील वॉर्ड १०६ उपचार सुरु असताना तिला मरण आले. इतर जखमींची प्रकृती चिंताजनक नसली तरी गंभिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातातील वाहनाची धडक एवढी जोरदार होती की त्यात वाहनाचा दर्शनीय भाग पूर्णपणे नष्ट झाला होता.  पुढील तपास हणजुण पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे. 

टॅग्स :Accidentअपघात