शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

गोव्यात आठ महिन्यांत तब्बल 42 महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 20:47 IST

मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाने चालविण्याचे प्रस्थ आता दक्षिण गोव्यातही फोफावू लागले आहे हे मंगळवारी कोलव्यातून उघडकीस आलेल्या प्रकरणातून पुढे आले आहे.

- सुशांत कुंकळयेकरमडगाव: मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाने चालविण्याचे प्रस्थ आता दक्षिण गोव्यातही फोफावू लागले आहे हे मंगळवारी कोलव्यातून उघडकीस आलेल्या प्रकरणातून पुढे आले आहे. आतापर्यंत गोव्यात वेश्या व्यवसायाशी संबंधित असलेली मागच्या आठ महिन्यांत 22 प्रकरणे उजेडात आली असून, या वेश्या व्यवसायासाठी वापरल्या गेलेल्या 42 युवतींची गोवा पोलिसांनी सुटका केली आहे. आतापर्यंत अशा प्रकरणात सामील असलेल्या 35 गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, त्यात आठ महिलांचाही समावेश आहे.कोलवा पोलिसांनी मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना चालविला होता. मंगळवारी या पार्लरचा पर्दाफाश करताना कोलवा पोलिसांनी मुंबईच्या रमेश उपाध्याय (42) व त्याची सहकारी जिनिता नायक (24-उडीशा) यांना अटक केली होती. एक तोतया ग्राहक पाठवून पोलिसांनी या पार्लरचा पर्दाफाश केला होता.कोलवाचे पोलीस निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, कोलव्यात बेकायदेशीरपणे चालणा-या पार्लर्सवर यापूर्वी नियंत्रण आणले होते. मात्र पोलिसांना चुकवून हे पार्लर चालू होते त्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही सापळा रचून त्यांना अटक केली. कोलव्यात आणखीही अशी पार्लर्स चालू आहेत का. याचा तपास पोलीस करत असून कोलव्यात चालू असलेल्या आयुर्वेदिक स्पाकडेही कायदेशीर परवाने आहेत का याची चौकशी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी कारवाई केलेल्या पार्लर चालकाकडे असा कुठलाही परवाना नसल्याचे परब यांनी सांगितले.दरम्यान, जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत गोवा पोलिसांकडून वेश्या व्यवसायाशी संबंधित असलेली 22 प्रकरणे नोंद केली असून, यातील निम्मी प्रकरणे कळंगूट-कांदोळी या पट्टय़ातील असून आतापर्यंत कळंगूट पोलीस स्थानकाच्या कक्षेत 11 प्रकरणाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ मडगावात चार, वेर्णा, पणजी व अंजुण या पोलीस स्थानकात प्रत्येकी दोन तर कोलवा पोलीस स्थानकात एक प्रकरण नोंद झाले आहे. या वेश्या व्यवसायात विदेशी युवती व गुन्हेगारांचाही समावेश असून 29 मार्च रोजी कळंगुट पोलिसांनी दोन अफगाणी आरोपींना अटक करताना उझबेकिस्तानच्या दोन युवतींना सोडविले होते. यापूर्वी 11 मार्चला हडफडे येथील डेल्टा क्लबमध्ये मारलेल्या छाप्यात पोलिसांनी दोन राजस्थानी आरोपींना अटक करताना पाच युवतींची सुटका केली होती, त्यात एका रशियन युवतींचाही समावेश होता. याशिवाय कळंगूट पोलिसांनी वेश्या व्यवसायात सामील असलेल्या दोन युगांडाच्या महिलांनाही अटक केली होती.मागच्या आठ महिन्यात गोवा पोलिसांनी 22 कारवाया केल्या असल्या तरी या कारवाया म्हणजे केवळ हिमनगाचे टोक अशी प्रतिक्रिया गोवा वुमन्स फोरमच्या निमंत्रक लॉर्ना फर्नाडिस यांनी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, गोव्यात वेश्या व्यवसाय अगदी लोकवस्तीत पोहोचला आहे. कित्येक वेळा भर वस्तीतल्या अपार्टमेंटमध्ये मुलींना ठेवून वेश्या व्यवसाय चालविला जातो. मात्र हा व्यवसाय एवढय़ा गुपचूपपणे चालतो की शेजारच्या अपार्टमेंटमध्ये रहाणा-यांनाही त्याची माहिती नसते असे त्या म्हणाल्या.लडकी कहा मिलती है?गोव्यातील वेश्या व्यवसाय नियंत्रणात यावा यासाठी हा प्रश्न लावून धरणारे गोवा वुमन्स फोरमच्या निमंत्रक लॉर्ना फर्नाडिस म्हणाल्या, गोव्याची संपूर्ण भारतात सेक्स डेस्टीनेशन म्हणूनच जाहिरात केली जाते. त्यामुळे गोव्यात येणारे कित्येक पर्यटक गोव्यात आल्या आल्या लडकी कहा मिलती है असा प्रश्न करतात. गोव्याची ही जाहिरात वेगवेगळ्या वेबसाईटवरून केली जाते. यासंदर्भात आम्ही पोलिसांकडे तक्रार केली तर अशा वेबसाईटवर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही असे पोलीस म्हणतात. हा विषय आम्ही राज्यपालापर्यंत नेला पण तिथूनही आम्हाला काही साध्य झाले नाही. यावर नियंत्रण आणणे कठीण असे आम्हाला सांगण्यात आले. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही न्यायालयात जनहित याचिका दाखल करा, असा अनाहूत सल्लाही आम्हाला मिळाला असे त्या म्हणाल्या.