शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण गोव्यात गांजाचा सुळसुळाट, 18 प्रकरणांत आतापर्यंत 20 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 18:15 IST

आतापर्यंत उत्तर गोव्याच्या किनारपट्टी पुरताच मर्यादित असलेला ड्रग्स व्यवसाय दक्षिण गोव्यातही वाढला असून यंदा आतापर्यंत तब्बल 18 प्रकरणांची दक्षिण गोव्यात नोंद झाली असून त्यात एकूण 20 जणांना अटक करण्यात आली आहे.

मडगाव : आतापर्यंत उत्तर गोव्याच्या किनारपट्टी पुरताच मर्यादित असलेला ड्रग्स व्यवसाय दक्षिण गोव्यातही वाढला असून यंदा आतापर्यंत तब्बल 18 प्रकरणांची दक्षिण गोव्यात नोंद झाली असून त्यात एकूण 20 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील बहुतेक प्रकरणो विदेशी पर्यटकांमध्ये मरीजुवाना तर देशी पर्यटकांमध्ये गांजा म्हणून प्रचलित असलेल्या अंमली पदार्थांचा जास्त समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी दक्षिण गोवा जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या मडगावपासून 7 कि.मी. अंतरावर असलेल्या दवर्ली येथे रात्रीच्यावेळी गांजाचे सेवन करताना मायणा कुडतरी पोलिसांनी कृष्णा पिल्ले व आदित्य मोहन या दोन युवकांना अटक केली होती. त्यांच्याकडे 5 हजाराचा गांजा सापडला होता. त्या आधी 7 नोव्हेंबरला मडगाव पोलिसांनी मोहनदास शेटकर या बस चालकाला अटक करुन त्याच्याकडून दहा हजाराचा गांजा जप्त केला होता.

सदर बसचालक बस चालविण्याच्या बहाण्याने गांजाही विकत होता हे पोलीस तपासात उघड झाले होते. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात दक्षिण गोव्यात एकूण अशा 14 प्रकरणांची नोंद झाली असली तरी आतार्पयत त्यापैकी केवळ 4 प्रकरणांतच आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांच्या माहितीप्रमाणं 2012 पासून उत्तर गोव्यातील हे ड्रग्सचे लोण दक्षिण गोव्यातही पसरू लागले आहेत. 2012 ते 2017 या पाच वर्षाच्या कालावधीत दक्षिण गोव्यात एकूण 56 प्रकरणो नोंद झाली असून त्यात 61 जणांना अटक झाली होती.

यंदा सर्वात जास्त प्रकरणो मडगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत झाली असून एकूण 8 प्रकरणात मडगाव पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. त्यामागोमाग वास्कोत 5, काणकोणात 2 तर मायणा कुडतरी व केपे या पोलीस स्थानकाच्या हद्दीत प्रत्येकी एका प्रकरणाची नोंद झाली आहे. 2016 साली दक्षिण गोव्यात एकूण अशा 13 प्रकरणांची नोंद झाली होती. दक्षिण गोव्यात रेल्वेस्थानक परिसरात अशा प्रकरणांची अधिक नोंद झाली असून काही प्रकरणो शैक्षणिक संस्थांजवळही घडली आहेत. त्यामुळे विद्यालयीन विद्याथ्र्यातही हे अंमलीपदार्थ पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांनीही अशा जागेवर आपले लक्ष केंद्रीत केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिका:याने दिली. 

टॅग्स :Crimeगुन्हा