शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

पणजीच्या राजरस्त्याचे वैभव हरपले...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 07:55 IST

मागील वीस वर्षांत नेमके काय बदलले आहे हे सांगायचे झाल्यास बांदोडकर मार्गावरील अशा तीन-चार मोक्याच्या स्थळांचा उल्लेख करावा लागेल.

- वामन प्रभू, ज्येष्ठ पत्रकार

पणजीशी माझी ओळख तशी गोवा मुक्ती आधीपासूनची म्हणजे साधारण ६४-६५ वर्षांची. पोर्तुगीज काळातील पणजी आणि आज चारही बाजूने विस्तारत गेलेले पणजी शहर, यात अर्थातच जमीन अस्मानाचा फरक. काळानुसार बदलत गेलेल्या आणि अजूनही पणजीत होत असलेल्या बऱ्या वाईट बदलाचा मीही एक साक्षीदार. मागील तीन-चार दशकांत तर पणजीचा एकूणच चेहरा बराच बदलत गेला आणि सिमेंट काँक्रिटची जंगलेही वाढत गेली. तीन-चार दशकांपूर्वीची पणजी आताशा दिसत नाही. पणजी खऱ्या अर्थाने म्हातारी झाली, असे गमतीने म्हटले जात असले तरी राजधानीच्या शहराची आज झालेली अवस्था पाहता 'पणजी' आपले लोभसवाणे वैभव हरवून बसलीय, हे नक्की.

पणजी स्मार्ट होतेय असे आपण मागील अनेक वर्षे ऐकतोय, माझ्यासारखा प्रत्येक जण आमची पणजी कधी स्मार्ट होईल याची प्रतीक्षा करत असला तरी स्मार्ट होण्यासाठी पणजीला अशाही अग्निदिव्यातून जावे लागणार आहे, याची मात्र कोणीही कल्पना केली नव्हती. खरोखरच स्मार्ट सिटीचा झगा चढवून घेण्यासाठी झालेली पणजीची अवस्था पाहता सरकारला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि स्मार्ट सिटीचे ग्रहण मागे लावून घेतले, असे अनेकांना वाटते. सध्या पणजीचे लोभसवाणे वैभव हरवून बसलो आहोत, हे नक्की.

पणजी शहरातील राजमार्गाचा विचार करता ही बाब प्रामुख्याने लक्षात येते. वीसेक वर्षांपूर्वीचा दयानंद बांदोडकर मार्ग आजही नजरेसमोरून हटवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी हटत नाही. येत्या दोन दिवसांत भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा गोव्यातील विसावा अध्याय सुरू होत असल्याने या राजमार्गाचे गतवैभव नव्याने डोळ्यांसमोर येत असावे आणि आज जे प्रत्यक्ष डोळ्यांना दिसते त्याच्याशी तेव्हाच्या वैभवाची तुलना करण्याचा मोह अनावर होत असेलही, पण पणजीच्या राजरस्त्याचे वैभव आम्ही गमावून बसलो आहोत हे सत्य नाकारता येणार नाही. पहिल्या इफ्फीवेळी म्हणजे २००४ मध्ये ज्यांनी ज्यांनी या रस्त्याचे मनोहारी' रूप प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितले असेल त्यांना निदान आजचे या राजरस्त्याचे ओंगळवाणे रूप पाहिल्यानंतर ही तुलना निश्चितच अप्रस्तुत वाटणार नाही. वर्षांत मांडवी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे आणि राजधानी पणजीची एकूणच रया गेली आहे. पाटो पुलापासून मिरामार सर्कलपर्यंत रात्रीची सहज जरी चक्कर मारली तरी कोणाच्याही नजरेतून हा बदल सुटणार नाही याची खात्री आहे.

मागील वीस वर्षांत नेमके काय बदलले आहे हे सांगायचे झाल्यास बांदोडकर मार्गावरील अशा तीन-चार मोक्याच्या स्थळांचा उल्लेख करावा लागेल. पणजीच्या राजरस्त्याची ही सौंदर्यस्थळे होती. या रस्यावर पोर्तुगीज काळापासून दिमाखात उभे असलेले आयकॉनिक हॉटेल मांडवी आणि या हॉटेलसमोरचा नेहमीच गजबजलेला असायचा तो प्रोमिनाद, हॉटेल मांडवी काही वर्षांपासून बंद आहे. ते बंद पडण्याची कारणे वेगळीच असतील, सरकारशी त्याचे काही सोयरसुतक नसले तरी मांडवी किनाऱ्याच्या माळेतील हे हॉटेल म्हणजे एक लखलखता हिरा होता, हे कोणीही मान्य करेल. सायंकाळच्या वेळी आमच्यासारखे अनेकजण तिथे जातात तेव्हा तेथील भकास वातावरण बघून मनाने जुन्या काळात कधी जाऊन पोचतो, हे कळतही नाही.

गोव्याची कला अकादमी म्हणजे गोमंतकीय कलेचे माहेरघर. मागील तीनेक वर्षे नूतनीकरणाच्या गोंडस नावाखाली कला अकादमी बंद राहिली. या काळात पणजीकर या वास्तूकडे एक भूतबंगला म्हणूनच पाहात होते. कायम गजबजाट असलेला हा परिसर तब्बल तीन वर्षे बंद राहिल्यानंतर त्याकडे पाहण्याची लोकांची नजर बदलली तर त्यांना दोष देता येणार नाही. पन्नासेक कोटी खर्चून नूतनीकरण केलेल्या या वास्तूचे नुकतेच उद्घाटन झाले असले तरी तो नेहमीचा गजबजाट दिसण्यासाठी अजून काही काळ थांबावे लागणार आहे. आवश्यक तंत्रज्ञान सुविधांचा अभाव असल्याने इफ्फीतील चित्रपटांचे प्रदर्शन करण्यास इफ्फीच्या तांत्रिक समितीने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे यंदाच्या इफ्फीतही हा परिसर ओकाबोकाच दिसणार आहे. राजरस्त्यावर कला अकादमीच्या रूपातील आणखी एक सौंदर्यस्थळ अजून काही काळ अंधारातच राहील असे दिसते. मिरामारच्या दिशेने पुढे जाताना डावीकडे फुटबॉल स्टेडियम गेली दोन-तीन वर्षांपासून उभे राहत आहे, तर उजवीकडेही सगळा आनंदी आनंदच आहे. आता इफ्फीच्या काळात ईएसजीचा परिसर काही दिवस थोड़ा लख्ख उजेडात न्हाऊन निघणार असला तरी मांडवी नदीत नांगर टाकून असलेले मोठमोठाले कसिनो हेच काय ते दुर्दैवाने पणजीच्या राजरस्त्याचे वैभव बनून राहिले आहेत.

पणजी गेली आठ-नऊ वर्षे स्मार्ट सिटीच्या अग्निदिव्यातून जात आहे. बेळगाव हुबळी या शहरांचे स्मार्ट सिटी योजनेखाली झालेले रूपांतर ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले असेल त्यांना पणजीचे काम का रखडले आहे, हे समजण्यापलीकडचे आहे. स्मार्ट सिटीच्या कामात कधीच पारदर्शकता नव्हती, ती दिसण्याची शक्यताही नाही. आठशे-साडेआठशे कोटी खर्च होणार आहेत इतकेच आम्ही जाणतो. पणजी आणि पणजीवासीयांनाही अजून किती काळ या अग्निदिव्यातून जावे लागणार आहे, याची कल्पना नाही. निदान पणजीच्या राजरस्त्याचे हरपलेले वैभव तरी परत मिळायला हवे याबद्दल दुमत नसावे. 

टॅग्स :goaगोवाSmart Cityस्मार्ट सिटी