शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी गिरीश चोडणकर यांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 22:15 IST

राहुल गांधी यांनी एकदा निर्णय घेतला तर मग आमदारांचीही डाळ शिजू शकणार नाही.

पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून गिरीश चोडणकर यानाच संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या चोडणकर यांच्यासाठी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक चेल्लाकुमार हेही प्रयत्नशील आहेत. त्यामुळे काही आमदारांचा आक्षेप असला तरी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे चोडणकर यांच्याच नावाला पसंती देतील अशा प्रकारची चर्चा काँग्रेसच्या आतिल वतुर्ळातही सुरू झाली आहे.काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्या मनात अचानक प्रदेशाध्यक्ष बनण्याची इच्छा निर्माण झाली आहे. ते त्यासाठी लॉबिंग करत आहेत. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना देखील काँग्रेसने जर प्रदेशाध्यक्षपद दिले तर त्यांना आता ते हवे आहे, असे सूत्रांनी सांगितले.काँग्रेस पक्ष संघटना चोडणकर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविण्याच्या बाजूने आहे पण काही आमदार त्यासाठी तयार नाहीत. अर्थात राहुल गांधी यांनी एकदा निर्णय घेतला तर मग आमदारांचीही डाळ शिजू शकणार नाही. चोडणकर जर प्रदेशाध्यक्ष झाले तर गोवा फॉरवर्ड पक्ष आमच्यासोबत सरकार स्थापनेसाठी येणार नाही अशा चुकीच्या भ्रमात गेले वर्षभर काँग्रेसचे काही आमदार वावरत आहेत. लुईङिान फालेरो यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोडले तर राज्यात लगेच काँग्रेसचे सरकार अधिकारावर येईल असे चित्र पक्षाच्या काही आमदारांनी गेल्यावर्षी बाबूश मोन्सेरातच्या आधारावर उभे केले होते पण फालेरो यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले तरी, काँग्रेसचे सरकार काही आले नाही. उलट मोन्सेरात यांचा ग्रेटर पीडीएचे चेअरमन म्हणून राज्याभिषेक झाला. आता शांताराम नाईक यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन चोवीस तास उलटले. भाजपप्रणित आघाडी सरकारमधील कुठलाच पक्ष गेल्या चोवीस तासांत काँग्रेसकडे सरकार स्थापनेसाठी आला नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष कोण होतात यावर सरकार घडणो किंवा न घडणो हे अवलंबून नाही  अशी चर्चा काँग्रेसशी अनेक वर्षे निष्ठावान असलेल्या पक्षाच्या कार्यकत्र्यामध्ये सुरू आहे.काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी येणारा नेता हा भाजप सरकारला शिंगावर घेणारा असावा, सर्व प्रकारचे गैरकारभार चव्हाटय़ावर आणणारा असावा असे राहुल गांधी यांना अपेक्षित असल्याचे चेल्लाकुमार यांनी काँग्रेसच्या काही आमदारांना सांगितले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत चेल्लाकुमार गोव्यात दाखल होणार आहेत.  

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी